file photo 
नागपूर

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले... आदिवासी युवकाची करुण कथा  

मेघराज मेश्राम

नागपूर : शहरात भागत नाही म्हणून तो सहा-सात महिन्यांपूर्वी नागपुरातून गावी आला. मोलमजुरी करू लागला. याचदरम्यान कोरोनाचे संकट घोंगावले. लॉकडाउनमुळे घरी बसावे लागल्याने त्याच्या रोजीरोटीचा प्रश्‍न पुन्हा जिवंत झाला. उपासमार होऊ लागली. हे कमी की काय, पाच-सहा दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने त्याच्या घराचे छप्परच उडाले. त्याचा संसार खुल्या आभाळाखाली आला. "भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले', अशी त्याची गत झाली आहे. 

हिंगणा तालुक्‍यातील किन्ही भानसुली गावातील दीपक परतेकी या गरीब आदिवासी युवकाची ही कथा. गावात रोजगार नाही म्हणून तो बायको-मुलांसह नागपूरला गेला. मिळेल ते काम करू लागला. किरायाने राहायचा. शहरात जगण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागते. खाणारी चार तोंडं. त्यामुळे त्याची गुजराण काही होत नव्हती. त्यामुळे त्याने पुन्हा गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. बिऱ्हाड घेऊन तो आपल्या गावी आला. 

दीपकने आपल्या झोपडीवजा घरात पुन्हा संसार थाटला. बायकोला सोबत घेऊन राबू लागला. दरम्यान, कोरोना विषाणूच्या थैमानामुळे देशात व राज्यात संचारबंदी लागू झाली. टाळेबंदीमुळे घरीच कैद व्हावे लागले. त्यामुळे दीपकचा रोजगार बुडाला. त्याच्या परिवारापुढे पुन्हा पोटाचा प्रश्‍न निर्माण झाला. त्याचे रेशन कार्ड नागपूरचे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदाराने त्याला धान्य देण्यास नकार दिला. डोळ्यांसमोर अन्नपाण्याचा घट्ट अंधार असतानाच मागील आठवड्यात आलेल्या वादळात त्याच्या घराचे अख्खे छप्पर उडाले. दीपक परिवारासह उघड्यावर आला.

सध्या त्याने शाळेत आसरा घेतला आहे. काय करावे हे त्याला सुचेनासे झाले आहे. पावसाळ्याआधी त्याला घर पुन्हा उभे करावे लागेल. या विपरीत परिस्थितीशी लढण्यासाठी तो सज्ज होत आहे. समाजातील दानशूरांनी दीपक परतेकी (मो. 7972106901) या युवकाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दिलीप दिवटे (7798583335) यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT