treatment on patient in dangerous ward in indira gandhi government medical college nagpur 
नागपूर

'मेयो'त रुग्णांचा जीव धोक्यात, कर्मचाऱ्यांनीच समोर आणले धक्कादायक वास्तव

केवल जीवनतारे

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) जीर्ण इमारतीमध्ये असलेल्या वॉर्डात रुग्णांना दाखल ठेवण्यात येते. यामुळे येथे उपचारासाठी दाखल रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. विशेष असे की, हे वॉर्ड धोकादायक असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. 

मेयोत असलेल्या या यंत्रणेचे हे भेसूर चित्र खुद्द कर्मचाऱ्यांनी पुढे आणले असून प्रशासनाच्या विरोधात काळी फित लावून आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवस काळी फित लावून आंदोलन केल्यानंतर बेमुदत संप पुकारण्याचा इशारा राष्ट्रीय मुल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या आरोग्य विभाग कर्मचारी शाखेच्या वतीने दिला आहे. विशेष असे की, मेयो रुग्णालयात नवीन सर्जिकल कॉम्लेक्स उभारले आहे. हे काम करण्यासाठी नवीन आस्थापना तयार करण्यात आली नाही, असे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रेमराज बोबडे यांनी सांगितले. जीर्ण इमारतीत अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल खुद्द येथील कर्मचारी विचारत आहेत. 

कोविड काळात परिचारिकांनी घेतलेल्या रजा बिनपगारी करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. परिचारिकांना ७ दिवसांचे कर्तव्य आणि ७ दिवसांची रजा असा कार्यक्रम होता. परंतु, यावर प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. परिचारिकांच्या रजा शिल्लक असताना त्या बिनपगारी करण्यात येऊ नये. 
-प्रेम राज बागडे, अध्यक्ष, राष्ट्रीय मुल निवासी बहुजन कर्मचारी संघ, आरोग्य विभाग कर्मचारी शाखा, मेयो. 

अशा आहेत मागण्या -

  • पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढावी 
  • पदोन्नतीनंतरचे लाभ देण्यात यावे 
  • खाटांच्या संख्येनुसार चतुर्थ श्रेणीची पदस्थापना 
  • आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी खाटा आरक्षित 
  • कोविड वॉर्डातील कर्मचाऱ्यांची वेतन कपात नको 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीड हादरलं! प्रेम प्रकरणाचा भीषण शेवट; प्रियकरानं टायर पंक्चरच्या दुकानात संपवलं आयुष्य, सुसाईड नोटमध्ये लिहिलं, 'मला मारहाण करत...'

Ashok Kharat Political Links : भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; ४०-४५ राजकीय नेत्यांची नावे मोबाईल क्लोन डेटातून उघड

Hormuz Strait: होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी किती द्यावा लागणार टोल? इराणने लागू केले नियम; कोणत्या जहाजांवर बंदी आहे?

नालंदा हादरलं! शीतला माता मंदिरात दर्शनासाठी उसळली गर्दी; चेंगराचेंगरीत आठ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

Pune Property: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात घरांच्या किमती वाढणार?; रेडीरेकनरच्या दरात ८ ते १० टक्के वाढ प्रस्तावित!

SCROLL FOR NEXT