नागपूर

Truck Driver Strike: पेट्रोल पंप होणार 'ड्राय'? पंपासमोर लांबच लांब रांगा, नागपुरातील पेट्रोल साठा संपण्याची शक्यता

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ट्रक चालकांनी केंद्र सरकारने लोकसभेमध्ये संमत केलेल्या कायद्यातील जाचक अटीविरुद्ध संप पुकारला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Petrol Crisis: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ट्रक चालकांनी केंद्र सरकारने लोकसभेमध्ये संमत केलेल्या कायद्यातील जाचक अटीविरुद्ध संप पुकारला आहे. त्याचवेळी इंधन कंपन्यांना पुरवठा करणाऱ्या टॅंकर चालकही तीन दिवसाच्या संपावर गेले आहे.

परिणामी, शहरात पेट्रोल- डिझेलचा तुटवडा जाणवण्याचे अफवा पसरल्याने अनेकांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केल्याने लांबच लांब रांगा लागल्या आहे. त्यामुळे उद्यापर्यंत शहरातील अनेक पेट्रोल पंप ड्राय होण्याची शक्यता असल्याचे संचालकांचे म्हणणे आहे.

ट्रान्सपोर्ट चालकांचा संप असल्यामुळे तीन दिवस पेट्रोल मिळणार नसल्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे, त्यामुळे पेट्रोल पंपांवर लांबलचक रांगा लागल्या होत्या. टँकर चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंदोलनात बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडिया ऑइल या तिन्ही सरकारी तेल कंपन्यांच्या टँकर चालकांचा समावेश आहे.

राज्याच्या विविध भागात टँकर बाहेर न पडल्याने इंधनाचा पुरवठा विस्कळित झाला. टँकर चालकांचा संप लवकर मिटला नाही तर राज्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा होण्यास अडचणी येऊ शकतात. लांबच लांब रांगा असल्यामुळे पेट्रोल ड्राय होण्याची शक्यता आहे. पंप चालकांकडून कंपन्यांकडून ऑर्डर घेणे बंद केलेले आहे. कारण त्यांच्याचकडे इंधन उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाने थेट तारीख सांगत दिले आदेश

Nashik Crime : नाशिक हादरले! ४०० कोटींच्या नोटांचा कंटेनर लुटल्याप्रकरणी आता 'एसआयटी' चौकशी

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सिझनवर प्रेक्षक व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT