mundhe 
नागपूर

तुकाराम मुंढेच जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करतात तेव्हा !

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी स्वतः मनपा आयुक्तांनी नागरिकांना घरातून बाहेर निघू नये, असे आवाहन केले. मात्र, आज शहरातील काही भागात त्यांनी पोलिस व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत केलेल्या दौऱ्यावरून ते नागपूरकरांच्या टिकेचे लक्ष्य ठरले. आयुक्त गर्दीसह फिरत असल्याने त्यांचे कृत्य जमावबंदी कायद्याचे उल्लंघन नाही काय? असा सवाल करीत अनेकांनी त्यांच्यावर बोचरी टिकाही केली.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 'लॉकडाऊन'चा आढावा घेण्यासाठी शहरातील सिताबर्डी, सेमिनरी हिल, हजारपहाड, फुटाळा, महाल, मोमीनपुरा, इतवारी, सेंट्रल एव्हेन्यू, कॉटन मार्केट या भागात दौरा केला. या दौऱ्यात पोलिस, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असा मोठा ताफा होता. त्यांच्या या दौऱ्यांचे फोटो तत्काळ सोशल मिडियावर "व्हायरल' झाले. या फोटोसह बेजबाबदार आयुक्त, आयुक्तांची हिरोगिरी, आयुक्तांचा पब्लिसिटी स्टंट अशी विशेषणे लावण्यात आली आहे. त्यावर अनेकांनी बोचरी टिका पोस्ट केली आहे. "पब्लिक घरात, आयुक्त मोकाट' अशी जहरी टिकाही काहींनी केली. आयुक्तांच्या दौऱ्यादरम्यान घरातील नागरिकही काय झाले म्हणून बघण्यास बाहेर आले. यातूनच मोठी गर्दी झाली. शहरात जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार कुठेही गर्दी होऊ नये, याबाबत दक्षता घेतली जात आहे. मात्र, आयुक्त 20 ते 25 जणांचा ताफा घेऊन फिरत असल्याने त्यांचे कृत्य कायदा मोडणारे नाही काय? असा सवालही काही नागरिकांनी उपस्थित केला. स्वतःच नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करायचे अन्‌ स्वतः ताफा घेऊन फिरत नागरिकांना बाहेर येण्याबाबत उत्सुकता निर्माण करायची, हा प्रकार आश्‍चर्यात टाकणारा असल्याचेही काही नागरिक म्हणाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक अंतर ठेवण्याची गरज असताना एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडून असे कृत्य अपेक्षित नसल्याचे एका नागरिकाने सोशल मिडियावर 'पोस्ट' केले आहे. आयुक्तांना लोकांना आवाहन करायचेच होते तर सोशल मिडियावर व्हीडीओ, ऑडिओद्वारेही करणे शक्‍य आहे, परंतु हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे मतही काहींनी नोंदविले आहे. दरम्यान अनेकांनी टिका केली असली तरी एकाने आयुक्तांची बाजूही उचलून धरली.

व्हेरायटी चौकातील स्टुडिओ केला बंद
व्हेरायटी चौकातील एक स्टुडिओ सुरू दिसताच मनपा आयुक्तांनी संबंधित स्टुडिओच्या व्यवस्थापकांना तात्काळ दुकान बंद करण्यास सांगितले. आयुक्तांच्या आदेशानंतर तातडीने स्टुडिओ बंद झाला. आयुक्तांनी महाल, बडकस चौक परिसरातील दुकानेही बंद केली. मोमीनपुऱ्यात दुकाने सुरू दिसली. नागरिकांची गर्दीही होती. त्या गर्दीला मार्गदर्शन करीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT