Tweet from Commissioner Tukaram Mundhe on financial condition, development 
नागपूर

तुकाराम मुंढेंचा आता सोशल मीडियावरून हल्ला, केले हे ट्विट...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सत्ताधाऱ्यांतील शीतयुद्ध आता सोशल मीडियावरही सुरू झाल्याचे चित्र आहे. आयुक्तांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीवरून रोखलेली विकासकामे पुन्हा सुरू करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिल्यानंतर आयुक्तांनी दुसऱ्याच दिवशी आर्थिक स्थिती व विकासाबाबत "ट्विट' केले. त्यांचे ट्विट सत्ताधाऱ्यांचे कान टोचणारे असल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. 

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर लक्ष केंद्रीत केले. महापालिकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी त्यांनी कार्यादेश न झालेली, कार्यादेश झालेली, परंतु सुरू न झालेली कामेही रोखली. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांचा संताप लपून राहीला नाही. 112 नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत सभागृह सार्वभौम असल्याचे नमुद करीत सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांना एकप्रकारे इशाराच दिला. 

गुरुवारी झालेल्या सभागृहात आयुक्तांनी घेतलेले निर्णय बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी रद्द ठरविले. कार्यादेश झालेल्या कामे सुरू करण्याचे निर्देश असो की शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याचा निर्णय असो, सभागृहात आयुक्तांच्या या दोन निर्णयासह इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याऐवजी सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय अंशतः फिरविण्यात आला. त्यामुळे आयुक्तांची कोंडी झाल्याचे स्पष्ट दिसून आले. 

हे आहे ट्विटमध्ये

सत्ताधाऱ्यांपुढे कधीही नमते न घेता शिस्तीत व नियमाने काम करणाऱ्या आयुक्तांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारीला ट्विट केले. नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शाश्‍वत विकासाचा दृष्टीकोन बाळगणे आवश्‍यक आहे. विकासाच्या दृष्टीला ध्येयाची जोड हवीच. मात्र, निधीही हवा, असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यांच्या ट्‌विटचे अनेकांनी स्वागतही केले. काहींनी ट्‌विटला उत्तर देताना पीएफचा पैसाही खर्चासाठी वापरणे तर अतीच झाल्याचेही म्हटले. 

सत्ताधाऱ्यांना टोला

काहींनी सिमेंट रस्त्याची कामे बंद करा, असेही आयुक्तांना सुचविले आहे. आयुक्तांचे ट्‌विट सत्ताधाऱ्यांना टोला असल्याची चर्चाही यानिमित्त रंगली आहे. त्यामुळे आयुक्त व सत्ताधारी वाद कुठल्या दिशेने जाईल, याबाबत नागपूकरांत चिंता व्यक्त केली जात आहे. विकासाच्या दृष्टीला ध्येयाची जोड आवश्‍यक आहे, परंतु निधीचीही गरज असल्याचे त्यांनी ट्विट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT