नागपूर

खेळणे जिवावर बेतले; मैदानात वीज पडून दोन युवक ठार

दिलीप गजभिये

खापरखेडा (जि. नागपूर) : परिसरातील चनकापूर चमत्कारी हनुमान मंदिरासमोर असलेल्या मैदानावर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वीज पडून दोन युवकांचा मृत्यू झाला. एक बालक किरकोळ जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तन्मय सुनील दहीकर (वय १७) व अनुज कुशवाह (वय २१) अशी मृत युवकांची नावे आहेत. तर सक्षम सुमित गोटफोडे (वय १३, रा. पाचपावली) असे किरकोळ जखमी बालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चनकापूर वेकोलि वसाहतीतील रहिवासी तन्मय व अनुज हे महाराष्ट्र विद्यालय ज्युनिअर कॉलेज, खापरखेडा येथील विद्यार्थी होते. मृत व जखमी चनकापूर मैदानावर पावसातच फुटबॉल खेळत होते. खापरखेडा परिसरात सव्वा चार वाजताच्या सुमारास विजेचा कडकडाटात मुसळधार पाऊस झाला.

पाच वाजताच्या सुमारास पाऊस कमी झाल्यानंतर फुटबॉल खेळत असताना अचानक वीज पडून दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर तिसरा मुलगा किरकोळ जखमी झाला. जखमी हा चनकापूर वेकोलि वसाहत येथे मिलिंद ढोरे यांच्याकडे पोळ्यासाठी आला होता. तसा तो नेहमी मिलिंद ढोरे या नानाकडे येत होता. यामुळे त्याचे चनकापूर वसाहतीत मित्र झाले होते. तो नेहमी चनकापूरला आल्यावर मित्रांसोबत खेळायचा.

शुक्रवारी तो युवकांसोबत पावसात खेळायला गेला होता. सोबत खेळत असलेल्या दोघांचा मृत्यू झाल तर तो थोडक्यात बचावला. त्याला उपचारार्थ मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती काही वेळातच वाऱ्यासारखी पसरली. खापरखेडा पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. दोन्ही युवकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर मेयो शासकीय रुग्णालयात पाठविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT