Two corona patients become better in Nagpur 
नागपूर

'तो' बरा होण्याची वाट पाहू अन्‌ आम्ही तिघेही सोबत घरी जाऊ, त्यांनी केला संकल्प...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूशी सुरू झालेल्या युद्धात उपराजधानीत कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. महिनाभरात 12 जणांनी कोरोनाला हरवले. तर सद्याच्या स्थितीत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचार घेत असलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी दोघे जण कोरोनातून बरे झाले आहेत. परंतु, बरे झालेल्यांच्या कुटुंबातीलच एक व्यक्ती कोरोनावर उपचारासाठी भरती असल्यामुळे या दोघांनी सुटी न घेता एकत्र घरी जाऊ असा संकल्प केला आहे. 

एकीकडे सरकारी रुग्णालयात उपचार करण्यास तयार नसताना कोरोनावर मेयो रुग्णालयातील औषधवैद्यक शास्त्र विभागातील डॉक्‍टर योग्य उपचार करीत असल्याने या विभागातील डॉक्‍टर आणि कोरोनाबाधितांचे एक नाते तयार होत आहेत. यामुळेच बरे झाल्यानंतरही कुटुंबातील एकाची बरे होण्याची प्रतीक्षा रुग्णालयातच करण्याचा मार्ग या कुटुंबातील दोघांनी स्वीकारला असल्याची माहिती नातेवाईकांच्या चर्चेतून प्राप्त झाली.

मेडिकलमध्ये 27 तर मेयोत 23

सद्या मेडिकल आणि मेयोत 51 रुग्ण भरती आहेत. यातील 27 जण मेडिकलमध्ये कोरोना वॉर्डात भरती आहेत. उर्वरित 23 रुग्ण मेयो रुग्णालयातील कोरोना वॉर्डात दाखल आहेत. यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत. 

येत्या तीन दिवसांत बरा होण्याची शक्‍यता

एकाच कुटुंबातील तीन व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. योग्य उपचार मिळाल्याने दोन व्यक्‍ती बरे झाले तर तिसरा व्यक्‍ती अजून बरा व्हायचा आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत तोही बरा होईल. तिसऱ्या व्यक्‍ती बरा झाल्यानंतरच संपूर्ण कुटुंब कोरोनामुक्त होऊन आम्ही घरी जाऊ असा संकल्प दोघांनी केला आहे. त्यांच्या या संकल्पाचे मेयो रुग्णालयात कौतुक करण्यात येत आहेत. 

दोन दिवसांत 13 रुग्णांची भर

उपराजधानीत कोरोनाबाधितांची दर दिवसाला वाढणारी संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरली आहे. शनिवार (ता. 18) आमदार निवास येथे विलगीकरणात असलेल्या चार कोरोना संशयितांचा अहवाल मेयोच्या प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरात कोरोनाबाधितांची संख्या 63 झाली होती. रविवारचा दिवस उजळत नाही तोच आणखी नऊ रुग्ण वाढले आहेत. यामुळे नागपुरातील एकूण रुग्णांची संख्या आता 72 वर पोहोचली आहे. दिवस उजळत नाही तोच रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. 

या आठवड्यात एकाच दिवशी आढळला नाही रुग्ण

या आठवड्यात एक दिवस अर्थात बुधवारी दिवसभरात एकही कोरोनाबाधित आढळला नव्हता. यामुळे प्रशासनाला आंशिक दिलासा मिळाला होता. ही साखळी खंडित होणे आवश्‍यक असल्याचे बोलले जात होते. परंतु, गुरुवारी दोघांना, शुक्रवारी एकाला तर शनिवारी आणखी चौघांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे प्रशासनाची पुन्हा चिंता वाढली आहे. तातडीने प्रशासनाने दोघांना विलगीकरण कक्षातून मेडिकल-मेयो मध्ये उपचारासाठी रवानगी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, RR vs SRH: सनरायझर्स हैदराबादने अचानक कर्णधार बदलला! नवा कॅप्टन टॉस जिंकून ईशान किशनबद्दल काय म्हणाला?

Police Recruitment : जुन्नरच्या अतिदुर्गम देवळे गावातील शेतकरी कुटुंबातील वैशाली शेळकेची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निवड

Pune Crime : अंमली पदार्थ विक्रीतील रेकॉर्डवरील आरोपी शेरखान पठाण दोन वर्षांसाठी पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी-चिंचवड हद्दीतून तडीपार

Education Success: श्री मुक्तादेवी विद्यालयाच्या साक्षी उंडे व अनुष्का भारमळ यांचा एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकदार यश

Pune School Award: जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलचा शैक्षणिक क्षेत्रात गौरव, पुणे जिल्हा परिषदेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मोहिमेत मानाचा बहुमान

SCROLL FOR NEXT