Two criminals stabbed a friend in the chest with knife 
नागपूर

'तेरी बहन बहोत माल दिखती हैं', हे ऐकताच तो संतापला आणि... 

अनिल कांबळे

नागपूर : शहरातील हत्याकांडाचे सत्र थांबता थांबत नसून आजही दोन कुख्यात गुन्हेगारांनी मित्राच्या छातीची चाकूने चाळणी करीत खात्मा केला. ही थरारक घटना आज रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास बारासिग्नल परिसरात घडली. गिरीश वासनिक (वय 28) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. अभिषेक बोरकर (वय 30, जाततरोडी) आणि नीलेश अंबुडरे (वय 30) अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक बोरकर आणि नीलेश अंबुडरे दोघेही कुख्यात आरोपी आहेत. दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास गिरीश वासनिक आणि अभिषेक बोरकर दोघे घराच्या वरच्या माळ्यावर दारू पित बसले होते. नुकताच जेलमधून सुटून आलेला नीलेश अंबुडरे याला अभिषेकने दारू पिण्यास बोलावले. तिघेही दारू पित बसले. 

दरम्यान, अभिषेकच्या बहिणीचा विषय निघाला. "तेरी बहन बहोत माल दिखती हैं' असे शब्द गिरीश वासनिकने वापरले. त्यामुळे अभिषेकचा पारा चढला. त्याने लगेच गिरीशच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी वाद घातला. दोघांनी हाणामारी सुरू केली. दरम्यान, नीलेश अंबुडरे याने सुरुवातीला भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गिरीशने त्यालाही शिवीगाळ केली. त्यामुळे अभिषेक आणि नीलेश यांनी धारदार चाकूने गिरीशच्या छातीवर सपासप वार केले. 

गिरीशच्या छातीची पार चाळण केली. त्यानंतर त्याच्या डोक्‍यात फरशी घातली. गिरीश मृत पावल्याची खात्री पटताच दोघांनीही वेगवेगळ्या दिशेने पळ काढला. माहिती मिळताच इमामवाड्याचे ठाणेदार मुकुंद साळुंखेपथकासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन मेडिकलला रवाना केला. याप्रकरणी अभिषेक आणि नीलेश अंबुडरेवर खुनाचा गुन्हा दाखल केला. अभिषेकला पोलिसांनी अटक केली असून नीलेशचा शोध सुरू आहे. 
 

जेलमधून सुटताच मर्डर 

नीलेश आणि अभिषेक बोरकरची मैत्री कारागृहात झाली होती. कोरोनाचे संकट लक्षात घेता गेल्या 26 जून रोजी म्हणजेच दोन दिवसांपूर्वीच नीलेश अंबुडरे याला मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात आले होते. कारागृहातून बाहेर येताच नीलेशने अभिषेकला हाताशी धरून गिरीशचा खून केला. 
 

मामा मी खून केला 

अभिषेक बोरकरने गिरीशचा खून केल्यानंतर आपल्या फार्मसीत काम करणाऱ्या मामाला फोन केला. "मामा गिरीशने माझ्या बहिणीच्या चारित्र्याबाबत अपशब्द वापरले. त्यामुळे त्याचा आत्ताच गेम केला' अशी माहिती दिली. मामाने त्याला लगेच चौकात बोलावले. त्याला दुचाकीवर बसविले आणि थेट इमामवाडा पोलिस गाठले. ठाणेदार साळुंखेयांच्यासमोर उभे केल्यानंतर अभिषेकने हत्याकांडाचा कबुली दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रतीक्षा संपणार? मॉन्सून अखेर विदर्भाच्या उंबरठ्यावर, कोणत्याही क्षणी होणार आगमन; तीन दिवस येलो अलर्ट

Parth Pawar : दौंड - पुणे लोकल सुरू करा; खासदार पार्थ पवार यांची मागणी

Pune Monsoon Arrival: प्रतीक्षा संपली! पुण्यात मान्सून दाखल; पुढील चार दिवसांत कसा असेल पाऊस? हवामान विभागाची माहिती

Parner News : माहितीअधिकार कायद्यातील दुरुस्त्यांबाबत मुख्य माहिती आयुक्तांसोबत अण्णा हजारे यांची बुधवारी चर्चा; त्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरणार

Pali News : ऐतिहासिक वारशाचे जतन! अवचितगडाच्या दरीतून 350 ते 400 किलोच्या 2 तोफांना काढले

SCROLL FOR NEXT