two different reports of the same person 
नागपूर

गंभीर बाब ! सरकारीत पॉझिटिव्ह, खाजगीत निगेटिव्ह...

राजेश प्रायकर

नागपूर : दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून आकडेवारीत घोळ असल्याची शंका एकाच व्यक्तीच्या दोन वेगवेगळ्या तपासणी अहवालामुळे निर्माण झाली आहे. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात तपासणी करण्यात आल्यानंतर एका तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह घोषित करण्यात आला. त्याच तरुणीने खाजगी लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे नेमका कुणावर भरवसा ठेवावा? असा प्रश्न या महिलेसोबतच नागपूरकरांपुढे उभा ठाकला आहे. 

एकाच महिलेच्या दोन वेगवेगळ्या अहवालाची बाब स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी पुढे आणली. वाठोडा येथील राधाकृष्णनगरातील एका २३ वर्षीय तरुणीच्या घशातील द्रवाचे नमुने महापालिकेने ७ ऑगस्टलला तपासणीसाठी घेतले. या महिलेचे नमुने नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. ८ ऑगस्टला पशुवैद्यकीय महाविद्यालयाने नमुने तपासणीनंतर या तरुणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा तयार करण्यात आला.

मात्र कुठलेही लक्षणे तसेच त्रास नसल्याने या तरुणीने एका खाजगी लॅबमध्ये १० ऑगस्टला स्वॅब तपासणी केली. यात ती निगेटिव्ह असल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे नेमका कुणाचा अहवाल खरा आणि कुणाचा खोटा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ ही तरुणीच नव्हे तर या अहवालावरून नागरिकांतही आता संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वीही असेच एक प्रकरण उघडकीस आले होते. त्यामुळे दररोज वाढणारी बाधितांच्या आकड्यात घोळ तर नाही ना? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. 

आयुक्तांच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह 
तरुणींच्या दोन वेगवेगळ्या अहवालाची बाब गंभीर आहे. याप्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. परंतु या गंभीर बाबतीतही त्यांनी फोन उचलला नाही, असे झलके यांनी सांगितले. त्यामुळे आयुक्तांच्या गांभीर्यावरही प्रश्नचिन्ह उपिस्थत झाले आहे. 
(संपादन : प्रशांत राॅय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT