eclipse google
नागपूर

भारतातून दिसणार दोन ग्रहणे; वर्षभरात १९ वेळा धूमकेतू पाहता येणार

खगोलीय घटनांनी मनोरंजक असे २०२२ हे वर्ष राहणार आहे

राजेश रामपूरकर

नागपूर : खगोलीय घटनांनी मनोरंजक असे २०२२ हे वर्ष राहणार आहे. यात चार ग्रहणे आहेत. त्यातील दोन ग्रहणे भारतातून दिसणार आहे. याशिवाय नऊ प्रमुख उल्का वर्षाव, सुपरमून, मायक्रोमून, ग्रहांची युती-प्रतियुती, काही धूमकेतू आणि पृथ्वी जवळून जाणाऱ्या धोकादायक उल्का घटनांचा समावेश आहे. खगोलप्रेमीं आणि अभ्यासकांसाठी हे वर्ष उत्तम आहे. पहिले खंडग्रास सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात दिसणार आहे. (first eclipse will occur in April)

ग्रहणे

अवकाशातील नयनरम्य घटना म्हणजे ग्रहणे. दरवर्षी कमीत कमी चार ग्रहणे असतात. या वर्षीही दोन सूर्य आणि दोन चंद्रग्रहण दिसणार आहेत. त्यातील शेवटची दोन ग्रहणे भारतातून खंडग्रास दिसेल. ३० एप्रिल २०२२ रोजी वर्षातील पहिले खंडग्रास सूर्यग्रहण होईल. परंतु ते भारतातून दिसणार नाही. १६ मे २०२२ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण सुद्धा भारतातून दिसणार नाही. २५ ऑक्टोबरला होणारे खग्रास सूर्यग्रहण मात्र, भारतातून दुपारी ४.४९ ते ६.७ वाजेपर्यंत खंडग्रास दिसणार आहे. तसेच आठ नोव्हेबर रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतातून सध्यांकाळी ५.३३ ते ७.२६ या वेळेत दिसणार आहे.(Eclipse is a beautiful event in space)

धूमकेतू

नवीन वर्षात शेकडो धूमकेतू आकाशात आहेत. त्यातील केवळ काहीच धूमकेतू डोळ्याने दिसणार आहे, तर काही बायनाकूलर आणि दुर्बिणीने दिसू शकेल. दूरचे धूमकेतू पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता असते. परंतु, पृथ्वी जवळ येणारे धूमकेतू साध्या डोळ्याने आणि द्विनेत्रीनेच चांगले दिसतात.(Comets approaching the Earth look good with the eye and binoculars)

  • जाणे ३ – धूमकेतू सी २०२९ ए१ लिओनार्दो

  • जाणे १२ -धूमकेतू १०४ पी कोवल

  • १६ जानेवारी -धूमकेतू ३३७ पी वाईस

  • १ फेब्रुवारी-धूमकेतू ७३ पी- बीडी श्वासमन-वाचमन

  • ९ फेब्रुवारी- धूमकेतू पी १९९७ बी१ कोबायाशी

  • २३ फेब्रुवारी-धूमकेतू -सी २०२० पी४ सी सोहो

  • १५ एप्रिल – धूमकेतू ४३० पी स्कॉटी

  • २१ एप्रिल - सी २०२१-०३ पँनस्टांर

  • २२ एप्रिल – धूमकेतू ७३ पीयू श्वासमन-वाचमन

  • २९ एप्रिल – धूमकेतू ४५ पी होंडा-मार्कोस

  • ११ मे – धूमकेतू सी २०२१ पँनस्टांर्स

  • ७ जून - धूमकेतू -६९ पी एनकॅंट

  • २५ ऑगस्ट – ७३ पी ३ श्वासमन-वाचमन

  • ३१ ऑगस्ट- सी २०२० पी४ बी सोहो

  • ५ सप्टेंबर- धुमकेतू ५१ पी-डी हँरीन्गटन

  • २६ नोव्हेंबर- धूमकेतू १०७ पी विल्सन-हँरिंगटन

  • २ डिसेंबर - बायनरी कॉमेट-२८८ पी

  • ३ डिसेंबर- धूमकेतू १९७ पी लिनिअर

  • १५ डिसेंबर -८१ पी डब्ल्यूआयएलडी

२०२२ वर्षातील खगोलीय घटना या निश्चितच ज्ञान वर्धनासाठी महत्त्वाच्या आहेत. चिकित्सकपणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून अवकाशातील या नयनरम्य घटनांचा आनंद घ्यावा. यंदा नऊ प्रमुख उल्कावर्षाव होणार आहे. सुपरमुन, मायक्रोमूनही पाहता येणार आहे.

- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, स्काय वॉच ग्रुप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे मराठी विजय मेळाव्यासाठी वरळी डोम येथे दाखल; थोडाचवेळात धडाडणार तोफ

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT