two escape from tigress at nagpur save their lives climb tree for 2 hours Sakal
नागपूर

Nagpur News : समोर पिलांसह वाघीण अन् ‘त्यांचे’ दोन तास झाडावर

दोघांनीही सांगितली आपबीती ः गावकरी आले आणि कशीबशी झाली सुटका

सकाळ वृत्तसेवा

- राहूल पिपरोदे

रामटेक : शनिवारी (ता.११) सायंकाळची वेळ. अंधार पसरत चालला होता. ‘ते’ दोघे गावापलिकडच्या शेतावर जायला निघाले. अवघ्या १ किलोमीटर अंतरावर जात नाही तोच, त्यांना पुढे दोन पिलांसह १०० मीटर अंतरावर वाघीण दिसली. अचानक पुढ्यात आलेल्या संकटाने दोघेही घाबरले. दरदरून घाम फुटला. वाघीण अधिकच आक्रमक दिसत होती. दोघेही समोरच्या झाडावर चढले आणि दोन तास थांबून वाघिणीच्या तावडीतून सुटले.

विजय अशोक बर्वे (वय ३२) आणि नंदलाल बकाराम कंगाले(वय ४०, दोघेही रा. डोंगरताल, ता. रामटेक) अशी त्यांची नावे आहेत. विजय आणि नंदलाल हे पाण्याची मोटर बंद करण्याकरिता निघाले. डोंगरतालपासून जवळच त्यांना समोर दोन बछड्यांसह एक वाघीण दिसली. दोघेही घाबरले. काय करावे त्यांना सूचेना.

परंतु नंदलालच्या समयसूचकतेने जवळ असलेल्या पळसाच्या झाडावर त्याने आधी विजयला चढवले व लगेच तोही झाडावर चढला. समोर १०० मीटरवर बछड्यांसह वाघीण उभी होती. झाड केवळ १० ते १२ फूट उंच असावे. वाघिणीने एका हाताचा जरी पंजा मारला तरी आपला फडशा पडणार अशी त्यांची स्थिती होती. पण स्वतःला सावरत त्यांनी प्रसंगावधाव राखून गावातील काही लोकांसह माजी सरपंच नितेश सोनवाने यांना फोन लावला.

काहींनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. गावातील ५० ते ६० नागरिक दुचाकीवर घटनास्थळी पोचले. सोबत वनकर्मचारीही होते. लोकांचा गोंधळ आणि प्रकाश पाहून ती वाघीण गुमान निघून गेली. लोकांना पाहून विजय व नंदलाल यांनाही धीर आला आणि दोघांनी सुटकेचा श्वास घेतला. फोन नसता तर रात्र झाडावर काढावी लागली असती, अशी आपबिती सुटकेनंतर त्यांनी व्यक्त केली.

तीन वाघांचा मुक्त संचार

परिसरातील वाघाकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे. वाघाच्या हल्ल्यात जखमी विठ्ठल वरकडे यांचा नुकताच मृत्यू झाला. तेव्हापासून अनेक गुरे व बकऱ्यांची शिकार झाली आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण आहे.

रात्रभर डोळ्यांसमोर होती वाघीण

या अनुभवाविषयी विजय बर्वे म्हणाले, शेतात जात असताना अचानक डोळ्यासमोर वाघीण दिसल्याने घाबरलो. समयसूचकतेने झाडावर चढलो. घाबरलेल्या अवस्थेत गावात फोन लावला. सर्व लोक धावून आले. सुटकेचा श्वास घेतला. परंतु रात्रभर डोळ्यांसमोर वाघीणच दिसत होती. इतकी भीती मनात घर करून होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune News : बालगंधर्वच्या आवारात हॉटेलचे पार्किंग; हॉटेल व्यावसायिकाने ठेकेदाराला केले मॅनेज

Hyundai Salary Hike : ह्युंदाई कर्मचाऱ्यांना नवरात्रीची मोठी भेट, मिळाली 'इतक्या' हजारांची भरघोस पगारवाढ

SCROLL FOR NEXT