corona mask 
नागपूर

अरे बाप रे! आणखी दोघांना कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूरच्या सतरंजीपुरा येथील कोरोनाच्या बाधेने दगावलेल्या रुग्णाच्या संपर्कातील एका नातेवाईकासह इंडोनेशियातून नागपुरात परतलेली एक महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मेडिकलच्या प्रयोगशाळेतून पुढे आला आहे. यामुळे प्रशासन हादरले आहे. दर दिवसाला बाधित रुग्णांची संख्या वाढत असून ती आता 27 वर पोहचली.
शनिवारी कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये मेयोत 5 एप्रिल रोजी दगावलेल्या सतरंजीपुरातील कोरोनाग्रस्त वृद्धाच्या 53 वर्षीय नातेवाईकाचा समावेश आहे. हा व्यक्ती सरतंजीपुरा येथे आजारी असतांना त्याला भेटायला त्याच्या घरी गेला होता. या रुग्णामुळे सतरंजीपुरातील पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सात आहे. मुळची चंद्रपूरची महिला इंडोनेशियातून पतीसह नागपूरात परतली होती. ही 52 वर्षीय महिला कोरोना बाधित आहे. या महिलेच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली होती. मेडिकलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी त्याच्या पत्नीला तपासणीसाठी आणले होते. नमुने तपासले असता, कोरोना असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. या दोन रुग्णांमुळे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 27 वर पोहचली आहे.

सविस्तर वाचा - यवतमाळ शहरातील या भागात करण्यात आली सीमाबंदी; प्रवेश करण्यास सक्त मनाई
मेयोपाठोपाठ "एम्स'मध्ये प्रतीक्षा यादी
मेयो रुग्णालयातील एक पीसीआर यंत्र बिघडले होते. यामुळे तेथील प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात नमुने तपासणीची प्रतीक्षा यादी तयार झाली होती. नुकतेच 6 एप्रिल रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) प्रयोगशाळा तयार केली. अद्ययावत अशा या प्रयोगशाळेत विषाणूजन्य आजाराची तपासणी सुरू झाली. अल्पावधित कोरोना तपासणीच्या पाचशेवर चाचण्या झाल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण खात्याने या प्रयोगशाळेवर पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हयांतील नमुने तपासणीचा भार टाकला आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री अचानक अमरावतीमधील शंभर नमुने तपासणीसाठी आले. याशिवाय इतर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने नमुने पोहोचले. एम्समध्ये दर दिवसाला 70 नमुने तपासता येतात. यामुळे एम्समध्येही नमुने तपासणीची प्रतीक्षा यादी वाढत असल्याची माहिती पुढे आली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT