Two wheeler man killed in Nagpur four-wheeler collision Nagpur accident news
Two wheeler man killed in Nagpur four-wheeler collision Nagpur accident news 
नागपूर

येणाऱ्या बाळासाठी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी गेला बाप; मात्र, बाळ येण्यापूर्वी देवाने घेतले बोलावून

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील आमडी फाट्यावर अनियंत्रित चारचाकीने दुचाकीला जबर धडक दिल्याने तरुण ठार झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी साडेसात वाजताचे सुमारास घडली. मृताचे नाव मंगेश यादवराव गावंडे (वय ३०, रा. दत्त मंदिराजवळ, गोधणी ता. नागपूर) असे आहे.

जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश यादवराव गावंडे हा दुचाकीने (एमएच ४० बीआर ४५९४) दोन मित्रासह दोन गाड्यांनी रामटेक गडावर दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास परत मनसर कामठीमार्गे नागपूरला जात असताना आमडी फाट्यावर देवलापारकडून नागपूरकडे जात असलेली अनियंत्रित चारचाकीच्या चालकाने निष्काळजीपणाने गाडी चालून मागच्या बाजूने दुचाकीला जबर धडक देऊन मंगेश गावंडे यास गंभीर जखमी केले.

चारचाकी गाडी घेऊन नागपूरच्या दिशेने पसार झाला. वाहतूक पोलिसांनी मंगेश गावंडेला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी कामठीच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसांना दिली असता पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.

जुनी कामठी पोलिस ठाण्यात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण पुढील तपास करण्यासाठी पारशिवनी पोलिसांकडे पाठवणार आहेत. मृत मंगेश गावंडे यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले असून त्याची पत्नी गर्भवती आहे. मृता पश्‍चात आई, वडील, पत्नी व दोन भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे. मंगेशच्या अपघाती निधनाबद्दल नातेवाईक हळहळ व्यक्त करीत होते.

उधारीच्या पैशाच्या वादातून तरुणाला मारहाण

उमरेड : यशवंत प्रल्हाद गेडाम (वय २८, रा. उकरवाडी हेटी, ता. उमरेड) हा गंगापूर फाट्याजवळ आपल्या मित्राची वाट पहात थांबला असता आरोपी ओंकार गोपीचंद खेडकर (रा. गंगापूर) हा फिर्यादीजवल आला व त्यास तू माझे उधारीचे पैसे कधी देतोस, असे विचारून उधारीच्या पैशाच्या कारणावरून फिर्यादी यशवंतच्या डोक्यावर व छातीवर कवेलू मारून जखमी केले. फिर्यादीच्या तोंडी बायनवरून व डॉक्टरच्या अहवालावरून गुन्हा नोंद केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT