नागपूर

जलसमाधी! अंबाळा तलावात पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

रामटेक (जि. नागपूर) : लॉकडाउनमध्ये सूट दिल्यानंतर नागपूरचे काही मित्र रामटेकला मौजमजा करायला गेले. प्रवेशबंदी असताना चोरून अंबाडा तलावात पोहायला गेलेल्या मित्रांपैकी दोघे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाल्याची घटना तीर्थक्षेत्र अंबाळा परिसरात बुधवारी (ता. ९) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. (Two-youths-drowned-in-Ambala-Lake-at-Ramtek)

प्राप्त माहितीनुसार, नागपूर रविनगर परिसरातील सहा मित्र निसर्ग प्रभाकर वाघ, कृणाल अशोक नेवारे, अभिनव जिचकार, प्रणय वासनिक, तन्मय कुंभारे, लक्ष्मीकांत बबडीलवार हे एमएच ४३-बीपी ५६०८ क्रमांकाच्या कारने रामटेककडे फिरायला आले. कोरोनामुळे तीर्थक्षेत्र अंबाळा तलाव परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी होमगार्डचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

परिसरात येताच होमगार्डने त्यांना परिसरात प्रवेश करण्यास मनाई केली. मात्र, युवकांनी रस्त्याच्या कडेला वाहन लावून डोंगरमार्गाने अंबाळा तलाव परिसरात प्रवेश केला. अंघोळ करण्यासाठी चार मित्र तलावात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न लागल्याने निसर्ग आणि कृणाल खोल पाण्यात बुडायला लागले. दोघांना आपला बचाव करता आला नाही. पाण्यात गटांगळ्या खात बुडू लागले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे प्रवेशबंदी असल्यामुळे त्यांना मदत करणारे तेथे कोणीही नव्हते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक मासेमारांच्या साहाय्याने शोध घेतला. तलावातून निसर्ग याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. कृणालचा अद्यापही शोध घेणे सुरू आहे. या शोध मोहिमेत स्थानिक मासेमार व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (रेस्क्यू टीम) सहभागी झाले असून शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक मकेश्वर, एपीआय शेंडगे हे घटनास्थळावर दाखल झाले. प्राथमिक तपास शिवाजी बोरकर, शिपाई संतोष मारबते करीत आहेत.

(Two-youths-drowned-in-Ambala-Lake-at-Ramtek)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT