file photo 
नागपूर

नवे संशोधन : व्हेंटिलेटर्ससाठी यू-शेप स्प्लिटर्स  

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या काळात व्हेंटिलेटर्सची मर्यादित संख्या वैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हान मानण्यात येत आहे. हीच बाब लक्षात घेऊन जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी व्हेंटिलेटर्ससाठी 'यू' आकाराच्या विशेष 'स्प्लिटर्स' विकसित केले. त्यामुळे एकच व्हेंटिलेटर एकापेक्षा अधिक लोकांसाठी वापरता येणे शक्‍य होणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरचा वापर करावा लागतो. देशातील रुग्णसंख्या बघता त्या तुलनेत व्हेंटिलेटरची संख्या बरीच कमी असल्याने परदेशातून त्याची मागणी केली आहे. सर्वसाधारण: एक व्हेंटिलेटर एका वेळी एकाच रुग्णासाठी वापरण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात एका रुग्णासाठी त्याचा 25 ते 35 टक्केच उपयोग होत असतो. त्यामुळे व्हेंटिलेटर्सचा दोन किंवा अधिक रुग्णांसाठी एकाच वेळी वापर व्हावा यासाठी रायसोनी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी 'यू' आकाराचे 'स्प्लिटर्स' तयार केले. सोबत 'सिंगल रिस्ट्रिक्‍टर'देखील विकसित केले. याचे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) यशस्वीपणे परीक्षणदेखील करण्यात आले.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. सचिन उंटवाले यांच्या मार्गदर्शनात डॉ. विभा बोरा यांच्या चमूने या प्रकल्पावर काम केले. डॉ. नीलेश आवटे, प्रा. राहुल जिभकाटे, रोहन देशपांडे, गौतम नितनवरे, सचिन फरताडे या चमूचा समावेश होता. हे 'स्प्लिटर्स' परीक्षणासाठी मेयोच्या एनास्थिसीऑलॉजीच्या प्रोफेसर डॉ. वैशाली शेलगावकर यांच्या सुपूर्द करण्यात आले. पहिल्या परीक्षणानंतर यात काही सुधारणा सुचविण्यात आल्या होत्या. मागील आठवड्यात याचे अंतिम परीक्षण करण्यात आले. रायसोनी महाविद्यालयाने 'आयपीआर'अंतर्गत या 'स्प्लिटर्स'ची नोंदणी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : सांगलीतून बाळाला उचललं अन् चिपळूणमध्ये एक लाख ८० हजारांना सौदा, पण माय लेकाच दोरी घट्ट होती...

Nagpur Farmer: ५६ हजारांवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच; अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, दिवाळीनंतरही मदतीपासून वंचित

Latest Marathi News Live Update : बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सोयाबीन भिजले

कबाली हत्तीनं अडवला रस्ता, १८ तास वाहतूक ठप्प; वाहनांच्या रांगा, VIDEO VIRAL

AUS vs IND: जरा इकडे ये ऐक... विराट कोहलीने कॅप्टन शुभमन गिलला हात धरून मागे खेचलं अन् मग...; Video Viral

SCROLL FOR NEXT