udhav thakare syas Why do Nagpurkars turn off my voice 
नागपूर

मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिपणी; नागपूरकर माझा आवाज का बंद करता?

राजेश चरपे

नागपूर : महाआघाडीच्या स्थापनेपासून आजी-माजी मुख्यमंत्री एकमेकांवर टीकास्र सोडण्याची एकही संधी सोडत नाही. नागपूरमधील विधान भवनात विधिमंडळ सचिवालयाच्या नव्या कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगीही याची सर्वांना प्रचीती आली. उद्धव ठाकरे यांनी ‘नागपूरकर माझा आवाज बंद करीत आहे’, असे गंमतीने सांगताना आम्ही विकेंद्रीकरण करणारे आहोत असाही टोला भाजपला लगावला.

विधिमंडळ सचिवालयाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री मुंबईतून व्हिडिओ कॉन्फ्ररंसच्या माध्यमातून सहभागी झाले होते. त्यांच्या भाषणा दरम्यान वारंवार तांत्रिक अडचणी येत होत्या. हे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी ‘नागपूरकर मला म्युट’ करीत असल्याची मिश्किल टीपणी केली. सध्या केंद्र सरकारतर्फे केंद्रीकरणाचा सपाटा लावला आहे. मात्र, आम्ही विकेंद्रीकरण करणारे आहोत. सचिवालयाचे उद्‍घाटन हा त्याचाच एक भाग आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

वैदर्भीयांची गैरसोय आता होणार नाही. आम्ही देणारे आहोत. विदर्भावर अन्याय करणार नाही. सचिवलायाच्या माध्यमातून मुंबई आणि नागपूर आणखी जवळ आले आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. महाआघाडीचे सरकार आल्यापासून भाजपच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. त्यांच्यावर टीकेची एकही संधी सोडली जात नाही. विदर्भातील प्रकल्प रोखले जात आहेत, पुन्हा आन्यायाची मालिका सुरू झाल्याचे आरोप काही भाजप नेत्यांतर्फे केले जात आहे, असे पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री आम्ही देणार आहोत आणि विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगून सर्वांचाच समाचार घेतला. हाच धागा पकडून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांगीण आणि समतोल विकास झाल्यास वैदर्भीयांची अन्यायाची भावना दूर होईल. आम्ही विदर्भावर अन्याय होणार याची काळजी घेऊ, असेही पटोले म्हणाले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT