Unbelievable proposal to come up against Tukaram Mundhe
Unbelievable proposal to come up against Tukaram Mundhe 
नागपूर

तुकाराम मुंढे यांना विकासकामे रोखणे भोवणार? अविश्‍वास प्रस्तावाचे संकेत!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनेक विकासकामे रोखले आहेत. यामुळे नगरसेवकांचे कामे होत नाही आहे. यामुळे नगरसेवक चिडले आहेत. तसेच त्यांच्या शिस्तीने अनेकजण त्रस्त झाले आहेत. तुकाराम मुंढे यांना भेटायला गेलेल्या नगरसेवकांना सुरक्षारक्षकांनी रोखले होते. यानंतर चर्चेदरम्यान आयुक्तांच्या मागे पोलिस अधिकारी, सुरक्षारक्षकांचा गराडा पाहून नगरसेवकांनी संताप व्यक्त करीत "आम्ही चोर, गुंड आहोत काय?' अशा शब्दात आयुक्तांना खडे बोल सुनावले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अविश्‍वासाचा प्रस्ताव दाखल होणार अशी चर्चा रंगली आहे. 

महापालिकेची सभा गुरुवारी सकाळी 11 वाजता आयोजिण्यात आली आहे. आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी अनेक विकासकामे थांबविल्याने संतप्त नगरसेवकांनी आयुक्तांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली होती. विकासकामे, नगरसेवक-आयुक्तांत संवाद नसल्यावरून चांगलेच वातावरण तापले होते. महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कपड्यापासून तर दाढीपर्यंत शिस्त लावणे सुरू केले. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीला मनपातील अधिकारी व कर्मचारी चांगलेच कंटाळले आहेत. 

कामकाजाच्या पद्धतीमुळे नागरिकसुद्धा तुकाराम मुंढे यांच्या विरोधात गेल्याने त्याचा फायदा घेत त्यांच्यावर अविश्‍वास ठरावाचा प्रस्ताव दाखल करण्याचा नाशिकमध्ये प्रयत्न करण्यात आला; परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची नाचक्की होईल म्हणून स्थानिक पातळीवर महापौरांशी चर्चा करून प्रस्ताव मागे घेण्यास भाग पाडले होते. आता तसाच प्रयत्न महापालिकेच्या सभेत होण्याची शक्‍यता आहे. यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

विकासकामे रोखल्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे. कामे होत नसल्यामुळे ते चिडलेले आहेत. तसेच आयुक्‍त वेळ देत नसल्यामुळे नगरसेवक चांगलेच चिडले होते. विकासकामे बंद केल्याने रोष अधिकच वाढला आहे. यावर आयुक्‍तांनी नवी कामे सुरू करण्यापूर्वी पैशाचे बघणे आवश्‍यक आहे. उत्पन्न कमी असेल तर प्राधान्य ठरवावे लागते. हे माझे धोरण आहे, यात कुठेही संभ्रम नाही. आवश्‍यक देणी पावण दोनशे कोटींची आहेत. ती कुणावर ढकलता येणार नाही, याचाही विचार करायला हवा. ज्या कामाचे कार्यादेश झाले, पण कामे सुरू झाली नाहीत, ज्या कामाचे कार्यादेश झाले नाही, अशी कामे रोखण्यात आली आहे. जी कामे सुरू आहे, ती सुरू राहील, असे उत्तर आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी दिले होते. आता त्यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT