Unexpected Sighting of Flamingo in Gondia 
नागपूर

पक्षीप्रेमींना सुखद धक्‍का; भंडारा, गोंदियात या पक्ष्यांचे झाले आगमन 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  गोंदिया व भंडारा दोन्ही जिल्हे तलावाचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. हिवाळ्यात या दोन्ही जिल्ह्यांमधील तलावांवर मोठ्या प्रमाणात परदेशी पक्ष्यांची जत्रा असते. ही पक्षीप्रेमींसाठी पर्वणीच असते. जुलै महिन्यात अचानक फ्लेमिंगो पक्ष्यांचे गोंदिया जिल्ह्यात दर्शन झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. तज्ज्ञांच्या मते या दोन्ही जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्ष्यांचे प्रथमच दर्शन झाले आहे. 

नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पूनम पाटे आज सकाळी गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्‍यातील सौंदड तलाव येथे 34 मोठ्या फ्लेमिंगो पक्ष्यांची नोंद केली. हिवाळ्यात गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांमधील तलावांवर मोठ्या प्रमाणात परदेशी पक्ष्यांचे आगमन होते. जुलै महिन्यात अचानकपणे फ्लेमिंगो पक्ष्याचे गोंदिया जिल्ह्यात अचानक दर्शन झाले. गेल्या 20 ते 22 वर्षांपूर्वी दोन पक्ष्यांचे दर्शन झाले होते. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी या परिसरात दिसले आहेत. 

लाखनी येथील अशोक गायधने यांनी सांगितले, 20 वर्षांपूर्वी गोंदिया व भंडारा जिल्ह्यामध्ये फ्लेमिंगो पक्षी पाहिल्याची नोंद आहे. सौंदड तलाव नवेगाव राष्ट्रीय उद्यानातून विस्थापित झालेल्या श्रीरामनगर व सौंदड गावामध्ये आहे. जवळून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जात असल्याने त्याठिकाणी लोकांचा व जनावरांचा वावर अधिक असल्याने फ्लेमिंगो पक्षी निघून जाण्याची शक्‍यता आहे. 

फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्यांमध्ये मोठे व लहान आकाराचे असे एकूण 34 पक्षी आहेत. फ्लेमिंगो पक्ष्यांच्या या अचानक दर्शनामुळे गोंदिया व भंडारा जिल्हयातील निसर्गप्रेमी व पक्षी मित्र खूप आश्‍चर्य व्यक्त करीत आनंदीही आहेत. रोहित पक्ष्यांच्या या अनपेक्षित दर्शनाची नोंद बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडेही केली आहे. पक्षी निरिक्षणासाठी पूनम पाटे यांच्यासोबत विभागीय वनाधिकारी उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक रूपाली सावंत, वनपरिक्षेत्र अधिकारी सदाशिव अवगान गेले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! विदर्भ वगळता सर्वत्र पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

IND A vs SL A: भारतीय अ संघ Tri-Series चा विजेता! वैभव सूर्यवंशीच्या वादळानंतर गोलंदाजांचा अचूक मारा, फायनलमध्ये श्रीलंका पराभूत

Krishna River Crisis: कृष्णा नदीचे दूषित पाणी आणि पाणी उपसा बंदीमुळे कोपर्डे हवेलीतील शेतकरी‑ग्रामस्थांवर दुहेरी संकट

Factory Gas Leak: फूड फॅक्टरीत अमोनिया गॅस गळतीचा भीषण कहर! ७ महिला कामगारांचा मृत्यू, ६७ लोकांची प्रकृती गंभीर, चौकशीचे आदेश

Latest Marathi News Live Update : उमरगा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमक

SCROLL FOR NEXT