Nagpur News sakal
नागपूर

Nagpur News : सर्वेक्षणात १० हजार हेक्टरची तफावत; कृषी ४० तर महसूल नुसार ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - नागपूर विभागात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, नुकसानीच्या आकड्यांत कृषी व महसूल विभागात तफावत असून तब्बल १० हजार हेक्टरचा फरक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आकडे कोण लपवत आहे याबद्दल चर्चा रंगू लागली आहे.

जुलै महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जीव आणि वित्तहानीही झाली. शेतकऱ्यांना नुकसानासाठी मदत देण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

नुकसानीचे पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे आदेशही शासनाने दिले. नागपूर विभागात सर्वेक्षण करण्यासाठी महसूल विभागाकडून ई-पंचनामे या नवीन पद्धतीचा वापर होत आहे.

नुकसानीचा प्राथमिक अहवालही प्राप्त झाला. परंतु कृषी व महसूल विभागामधील आकड्यात मोठी तफावत आहे. कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार नागपूर विभागात ४० हजार ४६३ हेक्टरमध्ये नुकसान झाले. तर महसूलच्या मते ३० हजार ५९९ हेक्टरमध्येच नुकसान झाले. दोन्ही विभागाच्या आकड्यात जवळपास १० हजार हेक्टरचा फरक आहे. त्यामुळे महसूल विभाग नुकसान कमी दाखवत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

११३७ कुटुंबांना खावटी

पूर व पावसाच्या पाण्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. लोकांच्या घरात पाणी शिरले. विभागात १ हजार १३७ कुटुंबांना खावटी ५ हजारप्रमाणे मंजूर करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार त्यांना वाढीव रक्कम देता येईल, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

शासनाला माहितीच पाठवली नाही

केंद्र सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत स्पष्ट केली आहे. जून व जुलै महिन्यात पावसाची परिस्थिती तसेच ट्रिगर १ लागू झाला किंवा नाही, याची माहिती शासनाला पाठवायची आहे. परंतु, ती माहितीच पाठवली नसल्याचे समोर आले.

४० जणांचा मृत्यू

नागपूर विभागात पूर व विजेमुळे ४० जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक १६ मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. तर ९४ जण जखमी झालेत. १४४ पशुंचा मृत्यू झाला. तर ४ हजार ८४८ घरांचे नुकसान झाले.

दोन्ही विभागाकडून माहिती प्राप्त झाली आहे. यात तफावत आहे. अंतिम अहवालात ते स्पष्ट होईल. ५ ऑगस्टपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

-विजयालक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त, नागपूर विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT