Ventilator Splitter created by Dr. Sancheti 
नागपूर

एका व्हेंटिलेटरद्वारे मिळणार आठ रुग्णांना श्‍वास, यांना होईल फायदा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसाला इजा पोहोचते. रुग्णाला श्‍वास घेणे असह्य होते. अशावेळी फुफ्फुस जेव्हा अतिशय कमी वेगाने काम करते तेव्हांच व्हेंटिलेटरची गरज पडते. 

व्हेंटिलेटरची कमतरता लक्षात घेता गंभीर रुग्ण वाढल्यास व्हेंटिलेटरअभावी उपचार थांबू शकतो. यावर हृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती यांनी मात केली. एका व्हेंटिलेटरमधून आठ जणांना ऑक्‍सिजनचा पुरवठा करता येइल, असे उपकरण त्यांनी तयार केले आहे. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

नागपुरात खासगीसह मेयो, मेडिकलमध्ये सुमारे 450 पेक्षा अधिक कृत्रिम श्‍वसननलीका नाही. शासनाकडून क्रिटिकल केअर तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशावेळी शासनाने डॉक्‍टर आनंद संचेती यांचा हा फार्मूला वापरला तर खाटांच्या तुलनेत व्हेंटिलेटरची सोय उपलब्ध होऊ शकते. शंभर खाटांच्या तुलनेत 60 टक्के कृत्रिम श्‍वसननलीकेची गरज पडते. 

एका रुग्णाचे इन्फेक्‍शन दुसऱ्या नाही 
संगणकाद्वारे थ्रीडी उपकरण तयार केले. अमेरीकेच्या थ्रीडी डिझाईनर, तंत्रज्ञाची मदत घेतली. नागपूरचे समीर भुसारी यांनी डिझाईननुसार उपकरण तयार करून दिले. सोमवारी त्यांनी या उपकरणाच्या मदतीने आठ रुग्णांना कृत्रिम श्‍वसननलीकेमधून ऑक्‍सिजन पुरविण्याचा प्रयोग केला. तो प्रयोग यशस्वी झाला. एका रुग्णाचे इन्फेक्‍शन दुसऱ्या रुग्णाला होऊ नये म्हणून युनिर्व्हसल फिल्टर लावले आहे. 
- डॉ. आनंद संचेती, 
संचालक न्यू ईरा हॉस्पिटल, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT