Vidarbha activists protest in Hundred places on Monday 
नागपूर

राज्य सरकार, तुम्हीच भरा कोरोना काळातील वीजबिल; विदर्भवाद्यांचे सोमवारी आंदोलन

योगेश बरवड

नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून वेगळा विदर्भ व वीजबिलाच्या मुद्द्यावर सोमवारी (ता. ७) विदर्भात शंभर ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना काळातील वीजबिल सरकारने भरावे, दोनशे युनिटपर्यंत वीजबिल माफ करावे, त्यानंतरचे वीजदर निम्मे करा, कृषीपंपाचे वीजबिल संपवा, विदर्भातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या, वेगळे विदर्भ राज्य आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. नागपुरात दुपारी १२ ते ४ दरम्यान व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.

कोरोनाच्या संकटामुळे उद्योग, व्यापार सर्व बंद राहिल्याने जनतेच्या खिशात पैसे नाहीत. या अडचणीच्या काळातही सरकारने वीजबिलात २१ टक्के वाढ केली. सोबत तीन महिन्यांचे एकत्रित भरमसाठ बिल पाठविले. नैसर्गिक संकटाच्या काळात बिल भरणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनीही वीजबिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. आता यु-टर्न घेत बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन कापण्याची भाषा करीत ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महावितरणने वीज कनेक्शन कापल्यास ते जोडून देण्याची मोहिमही समितीने आरंभली असून आरपारचा लढा देण्याचा आमचा मनसुबा असल्याचे नेवले यांनी सांगितले.

ऊर्जामंत्र्यांच्या घरावर चार जानेवारीला धडक

सोमवारी होणारे विदर्भव्यापी आंदोलन सरकारला अल्टिमेटम असेल. हिवाळी अधिवेशनात त्यावर निर्णय घेण्याची संधी सरकारला दिली जाईल. पण, तोडगा न निघाल्यास चार जानेवारीला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या धराला घेराव घातला जाईल. संविधान चौकातून पायी मोर्चा निघून राऊत यांच्या घरावर धडकेल, असे नेवले म्हणाले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT