Tiger Migration
Tiger Migration esakal
नागपूर

Tiger Migration : विदर्भातील वाघीण जाणार छत्तीसगडला

सकाळ ऑनलाईन टीम

Tiger Migration : चंद्रपूर वृत्तातील मोरवा जंगलात दीड महिन्यापूर्वी पकडण्यात आलेल्या अडीच वर्षांच्या वाघिणीला गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्या वाघाला लवकरच छत्तीसगड राज्यातील अचानक मार्ग व्याघ्र प्रकल्पात पाठविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील वाघिणीला इतर राज्यातील जंगलात सोडण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या २०२२ च्या अहवालानुसार छत्तीसगडमधील या प्रकल्पात सध्या पाच वाघ आहेत.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाघ हवा असल्याचे पत्र पाठविले होते. त्यानुसार शिंदे यांनी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पत्र पाठविले.

विदर्भातील वाघीण जाणार छत्तीसगडला

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) वाघिणीला पाठविण्यासाठी शोध घेत होते, चंद्रपूर विभागातील मोरवा बीटमधील वांध्री येथे सात ऑगस्टला या वाघिणीला पकडले होते. तिला गोरेवाडा बचाव केंद्रात जंगलात सोडण्याच्या दृष्टीने वेगळे ठेवलेले आहे. पत्रानुसार गोरेवाडा प्रशासनाने वाघिणीविषयीचा अहवाल दिला.

त्यात या वाघिणीने मानवावर हल्ला केला नसून मानव वन्यजीव संघर्षाचा इतिहास नाही. त्यामुळे तिला छत्तीसगडला हलवण्यास काहीही हरकत नसल्याचे कळविले. त्यामुळे सरकारने वाघिणीला हलविण्याबाबत पत्र दिले आहे, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता यांनी सांगितले. लवकरच छत्तीसगडला वाघीण पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने त्याला हिरवी झेंडी दाखविली आहे. विशेष म्हणजे राज्यातील वाघीण इतर राज्यातील जंगलात सोडण्याची ही पहिलीच घटना आहे.

छत्तीसगडमध्ये फक्त १७ वाघ

छत्तीसगडच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ४४.२५ टक्के वन क्षेत्र आहे. त्या राज्यात वाघांच्या संख्येत घट होत आहे. २०२२ च्या अहवालानुसार वाघांची संख्या फक्त १७ झालेली असून हा आकडा चिंता वाढविणारा आहे.

चार वाघ गेले गुजरातला

विशेष म्हणजे यापूर्वी गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील चार वाघ आणि चार बिबट गुजरातच्या जामनगर येथे हलविले आहेत. ते प्राणिसंग्रहालयात पाठविले आहे. तसेच छत्तीसगडमधील एका झूमध्येही वाघ गेलेले आहे.

दोन वाघिणींना सोडले नवेगाव- नागझिऱ्यात

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने तेथील वाघांना स्थलांतरित करण्याबाबत प्रयत्न करीत आहे. त्यानुसार ब्रम्हपुरी आणि गडचिरोली विभागातील दोन वाघीण नवेगाव-नागझिरा या व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित केल्या आहेत. मध्यंतरी ते वाघ छत्तीसगड राज्यातही जाऊन आलेले आहे. त्यांचा मागोवा घेण्यासाठी त्यांना कॉलर आयडीही लावण्यात आले आहे. त्यानुसार वाघाचा मागोवा घेतला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT