Tiger Reserve Recruitment : व्याघ्र प्रकल्पांतर्गत 10 वी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा नाही, थेट मुलाखत

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत रिक्त जागांसाठी पद भरती.
Tiger Reserve Recruitment
Tiger Reserve Recruitmentesakal

Pench Tiger Reserve Recruitment 2023 In Marathi :

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत रिक्त जागांसाठी पद भरती होत आहे. याठीकाणी विविध पदांसाठी एकूण १६ रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.

जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, उपजीविका तज्ज्ञ, सर्वेक्षण सहाय्यक, GIS तज्ज्ञ, ग्राफीक डिझायनर अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे. ही भरती थेट मुलाखत घेऊन करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

जीवशास्त्रज्ञ - वन्यजीवन विज्ञान, प्राणीशास्त्र, वानिकी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र मध्ये पदव्युत्तर किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी.

पशुवैद्यकीय अधिकारी - मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी, वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम. व्ही. एस. सी) ला प्राधान्य देण्यात येईल.

निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक - कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट किंवा पर्यटन व्यवस्थापन यात पदविका.

Tiger Reserve Recruitment
Forest Department : 'या' अभयारण्यातील प्रवासाला लागणार टोल; वन खात्यानं घेतला मोठा निर्णय

उपजीविका तज्ञ - सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) किंवा ग्रामीण व्यवस्थापन किंवा कृषी व्यवस्थापनात एमबीए ग्रामीण क्षेत्रात उपजीविका तज्ज्ञ म्हणून किमान २ वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजीविका तज्ज्ञ या कामाचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव.

सर्वेक्षण सहाय्यक - कोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग इंग्रजी ४० शब्द प्रती मिनीट, मराठी ३० शब्द प्रती मिनीट. सर्वेक्षण, जमीन विषयक किंवा जीआयएस मध्ये अनुभव.

GIS तज्ज्ञ - विज्ञान पदवी किंवा भूगोल विषयात बी. ए. व जीआयएस विषयाचा कमीत कमी ३ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव.

Tiger Reserve Recruitment
Forest : अभयारण्यातील पाणवठे पडले कोरडे! वन्य प्राण्यांची पाण्यासाठी लोकवस्तीत भटकंती

ग्राफिक डिझायनर - कोणत्याही शाखेतील पदवीधर, ग्राफीक डिझायनिंगमध्ये पदवी किंवा पदविका.

सिव्हिल इंजिनीअरींग - सिव्हील इंजिनीअर पदवीधर, या क्षेत्रात कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव.

बचाव मदत टीम - किमान SSC उत्तीर्ण, MS-CIT उत्तीर्ण, उमेदवारास वन विभागात प्रत्यक्ष वन्यप्राणी बचाव किंवा रेस्क्यू कार्य मोहिमेचा अनुभव प्रमाणपत्र

PDF जाहिरात – Pench Tiger Reserve Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com