नागपूर

फडणवीसांच्या नेतृत्वातच ओबीसी आरक्षणाची मागणी करू - वडेट्टीवार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी (OBC reservation) शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. आंदोलनातून ओबीसींचा मुद्दा समोर करून राज्य सरकारला टार्गेट केले गेले. आंदोलनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून भाजप सरकारचीच खिल्ली उडवण्यात आली. आपल्याच पक्षातील ओबीसी नेत्यांना संपवणारे आज आरक्षणाची गोष्ट करीत आहे, असे टोले हाणले गेले. असे असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘माझ्या हातात सत्ता द्या, तीन महिन्यांत आरक्षण मिळवून देतो’, असे म्हटले होते. यावर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar) यांनी ‘चेंडू तुमच्या हातात आहे, तो कसा वळवायाच तुम्हीच ठरवा’ असे म्हणत टोला हाणला आहे. (Vijay-Vadettiwar-said-that-we-will-demand-reservation-under-the-leadership-of-Devendra-Fadnavis)

ओबीसी आरक्षणावरून भाजप टांगलीच आक्रमक झाली आहे. ओबीसींवरील अन्याय खपवून घेणार नाही. आरक्षण मिळालेच पाहिजे असे म्हणत राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आहे. यावर आरोप-प्रत्यारोपांनी समाजाचे प्रश्न सुटत नाही तर चर्चेने सुटतात. ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात उद्या याचिका दाखल करणार आहे. केंद्र सरकारकडून एम्पेरीकल डेटा मिळावा यासाठी केंद्राला निर्देश द्यावे आणि जोपर्यंत इम्पेरीकल डेटा मिळत नाही तोपर्यंत राज्यातल्या निवडणुका स्थगित करण्यात यावा या मागण्या याचिकेत करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होता कामा नये, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

आमच्याकडे डेटा नाही. डेटा केंद्र सरकारकडे आहे. तो केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावा. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. आम्ही त्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडे जाऊ. त्याच्यासोबत जाऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करू वेळप्रसंगी त्यांच्या पाया पडू. आमचे नुकसना होत आहे. आमचे प्रश्न सोडवून द्या, अशी विनंती करू, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

मराठा आणि ब्राम्हण समाज एकत्र आहे. परंतु, ओबीसी समाज विविध जातीत विभागला गेला आहे. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. एकत्र येऊन दबाव टाकला, तर प्रश्न सोपे होतील. प्रश्न सुटले नाही तर गरज भासल्यास ओबीसी समाज संघर्षासाठी तयार आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

(Vijay-Vadettiwar-said-that-we-will-demand-reservation-under-the-leadership-of-Devendra-Fadnavis)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT