Vijay Wadettiwar Marathi News
Vijay Wadettiwar Marathi News Vijay Wadettiwar Marathi News
नागपूर

विजय वडेट्टीवार म्हणाले, ... तर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शिवसेनेतील बंडखोर आमदारांकडून पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करण्याच्या प्रकरणावर सोमवारी (ता. ११) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. संविधानावर आधारित व कायद्यानुसार निर्णय झाल्यास राज्यात नव्याने राजकीय भूकंप येईल, असे भाकित विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी रविवारी (ता. १०) व्यक्त केले. (Vijay Wadettiwar Marathi News)

उद्याच्या निकालाकडे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. निर्णय संविधानानुसारच होतात. ते होईल, अशी अपेक्षा आहे. निकालावर बरेचसे काही अवलंबून आहे. निकाल विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेला तर पुन्हा राजकीय भूकंप येईल. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion Cabinet) थांबला आहे. उद्याच्या निकालाची प्रतीक्षा आहे. त्यावर अधिक काही भाष्य करता येत नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

जाणीवपूर्वक बहुमत चाचणीला अनुपस्थित राहिलो नाही. विधानसभेत आधी चर्चा होईल व नंतर मतदान होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, संख्या कमी असल्याचे पाहून विश्वासदर्शक ठरावावर कौल मागण्यात आला. दरवाजा बंद झाला त्यावेळी आम्ही लॉबीत होतो.

मतदानाला अनुपस्थित राहायचे असते तर विधिमंडळात आलोच नसतो. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळीच अनुपस्थित असतो. अध्यक्ष पदाच्या वेळी त्यांच्याकडे बहुमत होते. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाचे मतदान केवळ औपचारिक होते, असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

आमच्या सरकारमध्ये शिंदे सुद्धा होते

शिंदे सरकारने उद्धव ठाकरे सरकारच्या सर्व विकासकामांना स्थगिती दिली आहे. वैयक्तिक कामे रद्द केली किंवा स्थगिती दिली तर ठिक आहे. सरसकट सर्वांना स्थगिती दिली. जलसंधारणाची कामे शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. सर्वच आमदारांचा मतदारसंघात ती होणार होती. अशाप्रकारे कामे रद्द केल्याने सरकारने जनतेवरच अन्याय केला आहे. आमच्या सरकारमध्ये शिंदे सुद्धा होते. त्यामुळे आमच्या सरकारच्या काळातील यश-अपयशात त्यांचादेखील वाटा असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT