नागपूर

Wardha: कामचोर कंत्राटदारांवर होणार दंडात्मक कारवाई! जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून भडकले आमदार

सकाळ डिजिटल टीम

Action on Contractor: विधानसभा श्रेत्रातील प्रत्येक गाव पाण्याने परिपूर्ण झाले पाहिजे हा माझा उद्देश आहे. यासाठी मी गत आठ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून आता अनेक गावाची पाण्याची समस्या कायमस्वरूपी दुर होणार आहे. या कामात अनेक कंत्रटदार दिरंगाई करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी अशा सुचना आमदार समीर कुणावार यांनी दिल्या.


समुद्रपूर शहरातील पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांना कामावरून अनेकांना धारेवर धरले. या बैठकीला उद्घाटन व मार्गदर्शक म्हणून आमदार समीर कुणावार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार कपिल हाटकर, गटविकास अधिकारी रोशनकुमार दुबे, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता वाघ, विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पावडे, लघुसिंचन विभागाचे उपअभियंता खैरे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता बिरासदार, कनिष्ठ अभियंता फटिंग, गावंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून आढावा बैठकीला सुरवात करण्यात आली. आमदार समीर कुणावार यांनी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ७१ ग्रामपंचायतीचा प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेक यांच्याकडून पाणी समस्या संबंधी स्वता आढावा घेतला.(Latest Marathi News)

यावेळी ज्या गावात येणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे अशा गावांसाठी आवश्यकतेनुसार कुठे कुपनलिका, तर कुठे विहीर खोलीकरण, नवीन पाइपलाइन, विहिरीत आडवे बोरी तर कुठे विहर अधिग्रहण आदी उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीसाठी सहाय्य गटविकास अधिकारी एकनाथ गुजरकर, विस्तार अधिकारी पि.एच. मुरार, विस्तार अधिकारी आर.के.जाधव, नितीन वानखेडे आदिंसह पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दर्जेदार कामाची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवकावर
जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुरु असलेल्या कामाचा आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांची कानउघडणी करुन तातडीने या योजनेचे काम पूर्ण करा यात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारवर दंड आकार आणि ज्यांनी आतपर्यंत कामे सुरू केली नाही अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (Latest Marathi News)

गावात पाणी हा मुख्य प्रश्न असून माझ्या कार्यकाळात पाणी टंचाईची ही आठवी पाणीपुरवठा आढावा बैठक आहे. येत्या काही दिवसात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे कामे पूर्ण होणार असून यातून अनेक गावांतील पाण्याच्या समस्या कायमस्वरूपी दुरु होणार आहे. फक्त हे कामे चांगली करून घेण्याची जबाबदारी ही सरपंच, ग्रामसेकांची आहे असे ते यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT