Wardha Yavatmal Train  Esakal
नागपूर

Wardha Yavatmal Railway: वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन ब्रॉडगेज रेल्वेचे काम पूर्ण, पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन ब्रॉडगेज रेल्वे रुळाचे काम यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यापर्यंत पूर्ण झाले आहे. यवतमाळकरांसाठी अत्यंत आनंद व गौरवाची ही बाब आहे.

सकाळ डिजिटल टीम

Wardha to Kalamb Railway Line: वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन ब्रॉडगेज रेल्वे रुळाचे काम यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यापर्यंत पूर्ण झाले आहे. यवतमाळकरांसाठी अत्यंत आनंद व गौरवाची ही बाब आहे. उद्‍घाटनासाठी येण्याची विनंती खासदार भावना गवळी यांनी केली होती. त्यानुसार येत्या २८ फेब्रुवारीला यवतमाळ येथील कार्यक्रमातून रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून या प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे.

यवतमाळ हा शेतकऱ्यांचा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जिल्ह्यात आले असताना त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पीएम पोर्टलवर हा प्रकल्प अपलोड करण्यात आला आहे.

ही रेल्वे लवकरच यवतमाळ शहरात प्रवेश करणार आहे. आता कळंबपर्यंत रेल्वे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने उद्‍घाटनाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. २८ फेब्रुवारीला कळंब येथून वर्ध्यापर्यंत रेल्वे धावणार आहे. या रेल्वेला प्रधानमंत्री मोदी हे यवतमाळ येथील कार्यक्रमातून हिरवी झेंडी दाखवतील. (Latest Marathi News)

कळंब ते यवतमाळ लवकरच रेल्वे ट्रायल घेण्याकरिता खासदार गवळी यांचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय शकुंतला रेल्वेला ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शकुंतलाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाल्यास यवतमाळकरांना मुंबईला जाण्याची अडचण दूर होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT