Agriculture Loss Sakal
नागपूर

Washim:नुकसानग्रस्तांच्या यादीत केवळ तीन तालुके! हे तालुके मदतीच्या कक्षेबाहेर; प्रशासनाची लालफितशाई

जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाने थैमान घातले होते या पावसाने तुर पिकाचे अतोनात नुकसान झाले तर रब्बीच्या हरभरा, गहू व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सकाळ डिजिटल टीम

Washim Crop Insurance: नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांना प्रशासनाच्या दप्तरी केवळ वाशीम, रिसोड व मालेगाव तालुक्यातच ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचे नमूद असून मंगरूळपीर, मानोरा व कारंजा तालुक्यात नुकसानच झाले नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केला आहे.


जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाने थैमान घातले होते या पावसाने तुर पिकाचे अतोनात नुकसान झाले तर रब्बीच्या हरभरा, गहू व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने पंचनाम्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने पंचनामे करण्याचे काम सुरू केल्याचे जाहीर केले होते.

घायकुतीला आलेल्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा असतांना जिल्हा प्रशासनाने ता. १८ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केलेल्या नुकसानभरपाई मागणी पत्रात केवळ वाशीम, रिसोड व मालेगाव तालुक्यातच ३३ टक्केपेक्षाजास्त नुकसान झाल्याचे नमुद केले आहे.

वास्तविक नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांना जिल्ह्यातील तीन तालुके निरंक का झाले याबाबत शेतकऱ्यांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या या पवित्र्याने तीन तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत.(Latest Marathi News)

६३,९२६ एकरचेच नुकसान
प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केलेल्या मागणीत वाशीम, रिसोड व मालेगाव तालुक्यातील ६३ हजार ९२६ एकर नुकसान झाल्याचे नमूद करून ७६ कोटी ३७ लाखांची मदत देण्याची विनंती केली आहे. मात्र ही रक्कम तीनच तालुक्यातच वितरित करण्यात येणार आहे.

प्रशासनाच्या घिसाडघाईने तीन तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. याचा अर्थ तीन तालुक्यातील महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी नुकसानीचा अहवाल सादर केला की तयारच केला नाही ही शंका आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे. वंचित राहीलेल्या तीन तालुक्यातील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांप्रती किती बेजबाबदार आहेत याची प्रचिती पुन्हा आली आहे- गजानन भोयर, विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution : दिल्लीत श्वास घेणेही कठीण, AQI ४00 च्या वर; २३ भागांत रेड झोन जाहीर

Budh Retrograde 2025: वृश्चिक राशीत बुधाचा वक्री प्रवास सुरू, 'या' राशींना मिळणार यश तर काहींचा वाढणार ताण अन् गैरसमज

Viral Video: महाभारतात युद्धानंतर मृतदेहांसोबत काय घडलं? रात्री सैनिक कुठे थांबत? त्या काळी हॉस्पिटल होतं?; AI व्हिडिओ व्हायरल

Asia Cup: आशिया करंडक भारतात येणार? तोडगा निघण्याची बीसीसीआय सचिवांकडून माहिती

Rahuri Accident: 'बारागाव नांदूर येथे दोन दुचाकींची धडक'; एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी; दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक

SCROLL FOR NEXT