RaiTown1a 
नागपूर

वसुंधरा माऊली, ग्रीन फाऊंडेशनने केले रायटाऊन-2 हिरवेगार 

राजेंद्र मारोटकर

नागपूर  : सिद्धीविनायक गाळेधारक मेन्टेनन्स सोसायटी (राय टाऊन-2), इसासनी येथे रविवारी (ता. 19) सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रीन फाऊंडेशन, कामठी आणि वसुंधरा माऊली सेवा संस्थेच्या वतीने सुमारे 150 वृक्षांची लागवड सोसायटी परिसरात करण्यात आली. 

एकेकाळी इसासनी आणि आजूबाजूचा परिसर अगदी ओसाड होता. परिसरात झाड नावालाच होते. मात्र, 2010 ला रायटाऊन-2 वसल्यापासून परिसर आज हिरवागार झाला आहे. परिणामी आज या भागात विविध जातींचे पक्षी आणि त्यांचा किलबिलाट एेकावयास मिळतो. यासाठी सिद्धीविनायक सोसायटीच्या वतीने विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून दरवर्षी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येतो. रविवारी (ता. 19) राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी ग्रीन फाऊंडेशन, कामठीचे सचिन नायडू यांनी सुमारे 150 विविध झाडांच्या रोपांचा पुरवठा केला होता. 

वसुंधरा माऊली सेवा संस्थेचे सदस्य बाबा देशपांडे त्यांच्या पुढाकारात सकाळी ८ वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी प्रियंका गुप्ता, रोहित देशपांडे, राजेश भोंडे, श्रीपाद पुराणीक, किशोर गंगाखेडकर, अजित जामकर, विजय डोंगरे, सविता सोनटक्के, नवीन जावळे, अनुसया काळे, संदीप अग्रवाल, आशीष महाबुद्धे, हरीश शहारे, आय क्‍लिन नागपूरचे संदीप, अजिंक्‍य, जयदीप यांनी विविध झाडांच्या रोपांची लागवड केली. यावेळी सिद्धीविनायक सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव राजू वनवे, कोषाध्यक्ष म्हसकर, अमित शर्मा, मनोहर भिशीकर, शेखर राऊत, चैतन्य मिश्रा, राजेंद्र मारोटकर, लीलाधर पटले, श्रीमती वाळके, श्रीमती बडवाईक तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

मागील वर्षीही केली होती लागवड 

विशेष म्हणजे, मागील वर्षीसुद्धा वसुंधरा माऊली सेवा संस्थेच्या वतीने सोसायटीमधील शिवाजी बालोद्यानात वृक्षारोपण आणि बौद्धविहार परिसरात सीड प्लांटेशन करण्यात आले होते. 

पाच हजार वृक्षांची आजवर केली लागवड 

वसुंधरा माऊली सेवा संस्थेचा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात खूप मोलाचा वाटा आहे. गेल्यावर्षी प्रियंका गुप्ता यांच्या नेतृत्वात सदस्यांनी गुरुपौर्णिमेला वृक्षारोपणाला प्रारंभ केला होता. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथून गजानन महाराजांच्या शेगावपर्यंत मार्गात येणाऱ्या विविध गावांमध्ये त्यांनी सुमारे 4 हजार 700 वृक्षांची लागवड केली. विशेष म्हणजे, जे गावकरी वृक्ष संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार होती, अशाच गावांमध्ये ही वृक्षलागवड करण्यात आली. यावर्षी सुद्धा पावसाळा सुरू झाल्यापासून सुमारे 300 वृक्षांची लागवड संस्थेने केली आहे. 

संपादन : राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT