नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आहे. त्यामुळे सामान्यांचे हाल होत आहे. अशातच रोज कमाई करणाऱ्यांचे हाल होत आहे. जीवनावश्यक वस्तू कशा विकत घ्याव्या, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. अशा वेळी अशा कामगारांच्या मदतीला सिटूने धाव घेतली आहे.
या अडचणीच्या समयी मोदी सरकार केवळ भाषण करीत आहे. त्यामुळे सिटूच्या अखिल भारतीय केंद्रीय समितीने भाषणबाजीचा निषेध केला असून कामगारांच्या इतर मागण्या, एकूण पॅकेजसाठी सिटू सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मागण्यांचे फलक हातात घेऊन "मोदी साहब भाषण नही राशन चाहीये' अशा घोषणा देत निषेधदिन पाळला. नागपुरातही असा निषेधदिन पाळण्यात आला. त्यात सिटू नागपूर जिल्हा कमिटीतर्फे सिटू सलग्न आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना, वैद्यकीय विक्री प्रतिनिधी संघटनेचे सदस्य व सिटू पदाधिकारी, लाल झंडा कोल माईन मजदुर युनियन तसेच नागपूर जनरल लेबर युनियन युनिटी उमरेड या संघटना सहभागी झाल्या होत्या.
वाचा - लॉकडाउनचे नियम मोडल्याची अशी अजब-गजब शिक्षा
आठ तासांच्या कामाची वेळ 12 तास करण्यात येऊ नये, सर्व स्थलांतरीत कामगारांसाठी अन्न व निवारा देण्यात यावा, सर्व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, पॅथॉलाजीस्ट, फार्मासिस्ट, आशा कर्मचारी यांना पीपीई किट, मास्क त इतर सुरक्षा साधने त्वरित देण्यात याव्यात. सर्व आरोग्य क्षेत्रात कार्यरत डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा 50 लाख रुपयांचा सुरक्षा विमा देण्यात यावा. आयकर लागू नसलेल्या संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या खात्यात रुपये 7500 रुपयांची आर्थिक मदत पुढील तीन महिन्यांसाठी देण्यात यावी.
असंघटित क्षेत्रातील कामगारांना कामावरून काढून टाकण्याचे बंद करावे. सर्व कामगारांना नियमित वेतन मिळावे. शेतकऱ्यांना किमान सपोर्ट किंमत जाहीर करण्यात यावी. मनरेगाची कामे 200 दिवस देण्यात यावी. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. दिलीप देशपांडे, वैभव जोगळेकर, चंद्रकांत बनसोड, अंशुल सावंत, राजेंद्र साठे, आशा कर्मचारी युनियन जिल्हाध्यक्ष आशा मेहता, संध्या मेहता, राजू मेहता आदींनी मागण्यांचे फलक हातात घेत घोषणा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.