heat wave sakal
नागपूर

weather update : विदर्भात दोन दिवस उन्हाच्या लाटेचा इशारा

प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात पुढील दोन दिवस उन्हाच्या लाटेचा इशारा दिल्याने उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नवतपा म्हटला की नऊ दिवस सूर्यनारायण अक्षरशः आग ओकतो. उन्हाचे तीव्र चटके जाणवतात. मात्र यंदाचा नवतपा दरवर्षीच्या तुलनेत काहीसा थंड राहिला. त्यामुळे नागपूरकरांनाही दिलासा मिळाला. शेवटच्या दिवशी कमाल तापमानाने त्रेचाळिशी गाठल्याने थोडेफार ऊन जाणवले. प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात पुढील दोन दिवस उन्हाच्या लाटेचा इशारा दिल्याने उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने यंदाच्या नवतपामध्ये कडक उन्हाचे संकेत दिले होते. मात्र मध्येच ''वेस्टर्न डिस्टर्बन्स'' आल्याने उन्हाची लाट ओसरली. नवतपाच्या पूर्वार्धात विदर्भात बहुतांश ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ रंगला. त्यामुळे ४४.३ अंशांच्या वर पारा जाऊ शकला नाही.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून विदर्भात उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहेत. शुक्रवारी नागपूरचे कमाल तापमान अर्ध्या अंशाने वाढून ४३ अंशांवर स्थिरावले. पुढील दोन दिवस अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असल्यामुळे तीव्र चटके बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT