नागपूर

शंभर लोकांमध्ये लग्न नको रे बाबा! कमी लोकांमधील विवाहाची प्रथा झाली रूढ!!

नीलेश डाखोरे

नागपूर : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून लग्न सोहळे नावापुरतेच राहिले आहे. सुरुवातीच्या काळात अनेकांनी निर्बंध हटेल आणि थाटात लग्न करता येईल म्हणू लग्नाची तारीख (Wedding invitations) वाढवली. मात्र, कोरोना वाढत गेला आणि सरकारचे नियमही कडक होत गेले. यामुळे कमीत कमी लोकांमध्ये विवाह करण्याची प्रथा आता रूढ झाली आहे. सोमवारपासून (ता. ७) सरकारने लग्न सोहळ्यासाठी परवानगी (Permission for the wedding ceremony) दिली असली तरी नागरिक शंभर लोकांना बोलवण्याच्या तयारीत नसल्याचे दिसून येत आहे. (Wedding-invitations-on-WhatsApp;-Invite-only-15-people)

नागपुरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड जीवितहानी झाली. आतापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ९५९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मात्र, आता सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या चांगलीच रोडावली आहे. मृत्यूही घटले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३७ टक्क्यांवर आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण कमी झाला आहे.

कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने राज्य सरकारने महाराष्ट्रातील जिल्ह्यांची पाच लेव्हलमध्ये विभागणी करून नवीन नियमावली जाहीर केली आहे. विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्यांचा लेव्हल एकमध्ये समावेश केला आहे. यानुसार पालकमंत्री नितीन राऊत यांनी रविवारी नवीन नियमावली जाहीर केली. यात त्यांनी लग्न समारंभाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून शंभर वऱ्हाडी किंवा हॉलच्या क्षमतेच्या पन्नास टक्केच लोकांना लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली.

यामुळे लग्न सोहळे असणाऱ्या घरांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी जुना अनुभव पाहता अनेकांनी कमी लोकांमध्येच लग्न करण्याचे नियोजन केले आहे. संभाव्य भीतीचा विचार करता रिस्क नको म्हणत पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोकांशी याबाबत संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी मत व्यक्त केले.

माझ्या भावाचे लग्न १३ जून रोजी होणार आहे. आम्ही अजून पत्रिका छापलेल्या नाही. सोमवारपासून १०० लोकांमध्ये लग्न करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, आम्ही १५ लोकांमध्येच लग्न करण्याचे ठरवले आहे. माझ्या घरी दोन छोटे मुलं आहेत. त्यांचा आणि गर्दीत कोरोना वाढण्याचा अनुभव पाठीशी असल्याने हा निर्णय घेतला आहे. छापील ऐवजी डिजिटल स्वरूपात लग्न पत्रिका व्हॉट्सअपवरूनच पाठवली आहे.
- दीपक राऊत, वर मंडळी
माझ्या साळ्याचे लग्न १८ जूनला होणार आहे. देवाला आणि नवरीच्या घरी पत्रिका देणे गरजेचे असल्याने शंभर पत्रिका छापल्या. पाच ते दहा पत्रिका सोडून कोणालाही आमंत्रण दिले नाही. शंभर लोकांची परवानगी असली तरी आम्हाला कोरोनाला निमंत्रण द्यायचे नाही.
- निखील भुते, वर मंडळी
कोरोनामुळे कमीत कमी लोकांमध्ये विवाह करण्याची प्रथा आता रूढ झाली आहे. फक्त २५ ते ५० लोकांनाच निमंत्रण दिले जात असल्याने लग्नपत्रिकाही छापणे जवळपास बंद झाले आहे. मात्र, आम्ही शंभरच्या कमी पत्रिका छापत नाही. आता शंभर लोकांना परवानगी मिळाली तरी वर-वधू मंडळींकडून अजून तरी चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.
- राहुल इंगळे, पत्रिका छपाईवाला

(Wedding-invitations-on-WhatsApp;-Invite-only-15-people)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : अमरनाथ यात्रा आजसाठी स्थगित

SCROLL FOR NEXT