file photo 
नागपूर

ऑनलाइन शिक्षणाचा फायदा किती? आढावाच नाही  

नीलेश डोये

नागपूर : ग्रामीण भागात निम्‍म्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांच्या घरी ॲण्ड्राइड फोनची व्यवस्था आहे. शिक्षकांनी किती विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आणि त्याचा नेमका फायदा काय झाला, याचा कोणताही लेखाजोखा प्रशासनाकडे नाही. याचा आढावाही आतापर्यंत घेण्यात आला नाही. त्यामुळे फक्त शिक्षण देण्याचा सोपस्कार पार पाडण्यात येत असल्याचे दिसते. 

कोरोनामुळे जीवनशैलीत बदल झाला. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. शाळाही बंद ठेवण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यावरून मोठी चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे नुकसान होत कामा नये, या हेतूने ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. ही व्यवस्था शहरी भागातील विद्यार्थ्यांना केंद्रित करून सुरू केल्याची टीका होत आहे. कारण, ग्रामीण भागात निम्म्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांच्या पालकाकडे ॲण्ड्राइड फोन आहे. यातही अनेकांकडे इंटरनेटची सुविधा नाही. प्रशासनाने ॲण्ड्राइड फोनची माहिती घेतली; परंतु त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा आहे की नाही, याची माहिती घेतली नाही. 

अनेकांकडे घरी एकापेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्यांची माहितीही घेण्यात आली नाही. ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना किती फायदा झाला, त्यांच्या ज्ञानात किती भर पडला याचा आढावाच आतापर्यंत घेण्यात आला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शिक्षकांनी विद्यार्थांच्या शिक्षणाकडे लक्षच दिले नाही. विद्यार्थ्यांनीही गांभीर्याने त्याकडे लक्ष दिले नाही. आता शेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांचे विद्यार्थ्यांकडे लक्ष नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन शिक्षण फारसे फायद्याचे नसल्याचे बोलले जात आहे. 

शिक्षकांची जबाबदारी होणार निश्चित? 
ऑनलाइन शिक्षण उत्तम प्रकारे सुरू असल्याचा दावा शिक्षकांकडून करण्यात येतो. ऑनलाइनच्या माध्यामातून झालेल्या शिकवणीतून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची गरज आहे. यात विद्यार्थी नापास किंवा कमी गुण मिळाल्यास संबंधित शिक्षकाला जबाबदार धरायला हवे. शिक्षकांची जबाबदारी निश्चित झाल्याशिवाय ऑनलाइन शिक्षण यशस्वी होणार नसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील परिस्थिती 

शाळा-२०३८  
एकूण विद्यार्थी-१५७२५२      
ॲण्ड्राइड असलेले-४७१७६         
ॲण्ड्राइड नसलेले-७८६२६              
फोन नसलेले-३१४५० 

संपादन : मेघराज मेश्राम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRPF Recruitment Row : एसआरपीएफ पोलिस भरती पेपरात ८५ प्रश्न ‘कॉपी-पेस्ट’; राज्यभर संताप, युद्धपातळीवर चौकशी सुरू

मी राजीनामा देणार नाही, भाजपने कट रचून हरवलंय; ममता बॅनर्जींचे गंभीर आरोप, पराभवानंतर घेतली पत्रकार परिषद

दररोज १५० बालकांवर अत्याचार; समाज अजूनही का गप्प? बालसुरक्षेचा ज्वलंत प्रश्न ऐरणीवर; धक्कादायक आकडेवारी समोर

Business Scheme: बिझनेस सुरू करायचाय? सरकारच्या या 5 योजना बदलतील तुमचं नशीब, मिळू शकतं तब्बल 2 कोटींपर्यंत कर्ज!

Latest Marathi News Live Update : शिमलामधील अनेक भागात मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT