Vishnu-Manohar 
नागपूर

निरोगी राहण्यासाठी विष्णू मनोहर यांनी काय खाण्याचा सल्ला दिला ? 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मानवी जीवनाच्या आरोग्यास पोषक असलेल्या या रानभाज्यांचा उपयोग स्वयंपाकघरात फायद्याचा असला तरी, त्याविषयी अनेकजण अनभिज्ञ आहेत. या भाज्यांमधून मिळणारे गुणसत्व निश्‍चितच बहुपयोगी असून, यासाठी अधिकाधिक प्रसार गरजेचा आहे. असे सांगताना विष्णू मनोहर यांनी "रानभाज्या खा, स्वस्थ राहा', असे आवाहन ऑनलाईन मुलखतीत केले. 

गिरीश गांधी फाऊंडेशन व वनराई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यामाने "रानभाज्यातून तृप्ती व आजारातून मुक्ती' या विषयावर या ऑनलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. रेखा दंडिगे घिया यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी निवडक रानभाज्या शिजविण्याची कृती देखील सांगितली. अनेकांना रानभाजीची चव आवडत नाही तर काहींना याविषयी भिती वाटते. मात्र आरोग्यास गुणकारी असल्याने नागरिकांनी भाज्यांचा उपयोग वाढविण्याची गरज असल्याचे मनोहर म्हणाले. शिवाय नागरिकांच्या प्रश्‍नांचे निराकरण करण्यासही मनोहर विसरले नाहीत. 

पूर्वी कोकणात पिकणाऱ्या रानभाज्यांची आता विदर्भातही लागवड होते. मात्र गरज भागविण्यापुरती होत लागवड होत नसल्याने प्रत्येकाने रानभाज्या घरात पिकविणे आवश्‍यक असल्याचे मनोहर म्हणाले. या भाज्या मधुमेह व हृदयविकाराच्या आजार असलेल्या व्यक्‍तीची प्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी विष्णू मनोहर यांनी तरोट्यापासून भजी तयार केले. नदी किनारी उगविणाऱ्या रानभाज्या कोणत्या यासाठी नजर गरजेची असते. या भाज्याचे संशोधन होणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले. जोपर्यंत या भाज्यांना व्यवसायिक स्वरुप येणार नाही तोपर्यंत त्याचे महत्त्व प्रकाशात येणार असल्याचे देखील मनोहर म्हणाले. यावेळी कमतला. खारखुटी, बतरा, तरोटा, रानदुधी, दिवती या रानभाज्याचे महत्त्व पटवून सांगितले. निलेश खांडेकर यांनी प्रास्ताविक केले तर अजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी विजय जथे, र्मिंलद देशकर उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT