What DonateCart does to help the community .... read more 
नागपूर

समाजाच्या मदतीसाठी काय करतेय ‘डोनेटकार्ट' .... वाचा सविस्तर

मंगेश गोमासे

नागपूर  ः स्वयंसेवी संस्थांना मदत करीत असताना ती नेमकी योग्य व्यक्तींना होतेय का? याबाबत दानदात्याच्या मनात अनेक शंका-कुशंका येत असतात. त्या सर्व शंका दूर करीत, दिलेल्या दानातून योग्य व्यक्तीला मदत केल्याचे समाधान आणि त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने अनिल कुमार शेट्टी आणि संदीप शर्मा यांनी सामाजिक जाणिवेतून ‘डोनेटकार्ट' नावाचे संकेतस्थळ विकसित केले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून योग्य व्यक्तींना मदत करण्याचे काम सुरू केले आहे.

विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेत शिकलेल्या अनिल कुमार शेट्टी यांना सामाजिक कामात सहभागी होण्याची आवड होती. यातूनच २०१५ साली चेन्नई येथे आलेल्या पुरातील नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने त्याने एका स्वयंसेवी संस्थेसोबत काम केले. यादरम्यान पूरग्रस्त नागरिकांना मदत करताना त्यांना योग्य मदत मिळत नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले. यामुळे अशा नागरिकांना योग्य मदत मिळावी यासाठी त्यांनी एक संकल्पना मांडत, संकेतस्थळ तयार करण्याचा निर्णय घेतला.

‘डोनेटकार्ट' नावाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून दानदात्यांकडून थेट रक्कम न घेता, त्यांना नेमके काय द्यायचे आहे, हे जाणून घेत, ते स्वयंसेवी संस्थांना निःशुल्क वितरित करीत, गरजूंना मदत करता येणे शक्य झाले. यासाठी स्वयंसेवी संस्थांनाही नेमके काय हवे आहे, याबाबत नोंद करावी लागते. शिवाय सामानाचे वाटप केल्यावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करावे लागते. हे फोटो आणि व्हिडिओ ज्यांनी दान केले, त्यांना पाठविण्यात येतात. यातून दानदात्यांचा विश्वास अधिक वाढतो. जवळपास एक हजार स्वयंसेवी संस्थांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात संकेतस्थळाच्या माध्यमातून जवळपास ४० कोटींची गरजूंना मदत करण्यात आली आहे. यासाठी मेंटॉर म्हणून आयटी तज्ज्ञ शशीकांत चौधरी यांनी मार्गदर्शन केले.


सामाजिक कार्याची आवड
सामाजिक कार्याची आवड म्हणून या क्षेत्रात काम करण्यासाठी स्टार्टअप सुरू केले. यातून गरजूंना मदत आणि मदत करणाऱ्यांना योग्य व्यक्तीना मिळत असल्याचे समाधान या दोन्ही गोष्टी साध्य करता आल्या आहेत.
अनिल कुमार शेट्टी, संचालक, ‘डोनेटकार्ट'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Ganpati Panchayatan Sansthan Sangli : ‘किमान दोघांना लोळवण्याची ताकद’; अभिनेत्री भाग्यश्रीच्या पूजेवर विजयसिंह राजे संतापले

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

IND vs AFG 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार, पण मग Playing XI मधून बाहेर कोण बसणार? भारताकडे आज व्हाईटवॉश देण्याची संधी

SCROLL FOR NEXT