This is what happened to those who rob women 
नागपूर

महिलांना लुटणाऱ्यांना अशी घडली अद्दल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने लुटून नेणाऱ्या एका लुटारूला शहर गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने अटक केली. दोन लुटारू फरार आहेत. राहुल मल्लेश आरमुल्ला (23, बंगाली कॅम्प, चंद्रपूर) असे अटकेतील लुटारूचे नाव आहे. मुरली परशुरामन (28, तमिळनाडू) आणि राकेश राणीपती (29, बंगाली कॅम्प, चंद्रपूर) हे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल, मुरली आणि राकेश यांनी जानेवारी 2020 मध्ये शहरात पाच ठिकाणी लूटमार करून एकच खळबळ उडवून दिली. 23 जानेवारी रोजी रात्री 12 च्या सुमारास शिवशक्तीनगर येथे राहणारा लतेश कवडू वाघमारे हा त्याच्या दुचाकीने जात असताना तीनही लुटारूंनी त्याला अडविले. तलेशला चाकूचा धाक दाखवून त्याची दुचाकी लुटून नेली होती. त्यानंतर या लुटारूंनी 23 जानेवारी रोजी सकाळी 5.30च्या सुमारास हुडकेश्‍वर हद्दीत सरस्वतीनगर येथे राहणाऱ्या दुर्गा मनोज नागपुरे यांची लूटमार केली. 24 जानेवारी रोजी सकाळी 5च्या सुमारास बेबी रामधन राठोड (63) या योगासाठी जात असताना लुटारूंनी त्यांना अडविले. राठोड यांच्या गळ्यावर चाकू लावून त्यांच्याजवळील 18 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र लुटून नेले होते. त्याच दिवशी वाठोडा हद्दीत विद्या राजू सहारे (41) रा. जुनी दिघोरी यांना लुटले होते. 25 जानेवारीला गोपालकृष्णनगर, वाठोडा येथे राहणाऱ्या बेबीताई रत्नाकर उरकुडे (50) यांना नंदनवन हद्दीत लुटले होते. त्याचप्रमाणे या लुटारूंनी सक्करदरा येथे एका ठिकाणी आणि हुडकेश्‍वर हद्दीत दोन ठिकाणी लूटमार करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनांची संबंधित पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.

असा लागला छडा

युनिट 4 चे प्रमुख अशोक मेश्राम यांनी प्रत्येक घटनास्थळाची पाहणी करून तपासणी केली होती. पोलिसांनी डम्प डाटावरून त्यांचे लोकेशन मिळविले. त्यातील एक क्रमांक तमिळनाडू येथे कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यामुळे पोलिस पथक तमिळनाडूला गेले होते. तमिळनाडू येथे लुटारूंचा शोध घेतला असता राहुल आरमुल्ला हा चंद्रपूरच्या कारागृहात असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून लुटीची दुचाकी, मोबाईल, सोन्याचे दागिने असा 1 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, सहायक निरीक्षक किरण चौगले, दिलीप चंदन यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बहिणीचा पुरलेला मृतदेह उकरुन बँकेत आणला; वीस हजारांसाठी गरीब भावाचा संताप, व्हिडीओ व्हायरल

Virat Kohli: किंग कोहलीनं ऑटोगाफच दिला नाही... चिमुकला बॅट आपटत ढसाढसा रडला; Video तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update: बुलढाण्यातील खामगाव चौकात प्रशांत आंबी यांचं आंदोलन सुरु

'स्मिता पाटील यांच्या बर्फावरील पार्थिवाचा मी मेकअर करत होतो' आर्टिस्ट म्हणाले, 'तिची शेवटची इच्छा...'

Shivaji Kon Hota : प्रकाशक प्रशांत आंबी बुलढाण्यात स्थानबद्ध, डाव्या चळवळीतील कार्यकर्ते संजय गायकवाड यांच्याविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT