What if you walk in a girls hostel building? 
नागपूर

मुलींच्या वसतिगृहांच्या इमारतीत चालतयं तरी काय ?

मंगेश गोमासे

नागपूर,  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या जवळपास 70 महाविद्यालयांना 2007-08 साली विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळालेल्या 1 कोटीच्या अनुदानातून मुलींसाठी वसतिगृहे तयार करण्यात आली. मात्र, अनुदानातून तयार करण्यात आलेल्या इमारतीमध्ये मुलींऐवजी महाविद्यालयांचेच विविध विभाग आणि विविध विषयांचे वर्ग सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे ज्या उद्देशासाठी अनुदान आयोगाने पैसे दिलेत, तो उद्देश साध्य होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

राज्यातील बऱ्याच महाविद्यालयात आजुबाजुच्या गावातून मुली उच्च शिक्षणासाठी येत असतात. त्यांच्या शिक्षणासह राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने बऱ्याच नामवंत शिक्षण संस्थांद्वारे मुलींच्या वसतिगृहासाठी प्रस्ताव टाकण्यात आले. या प्रस्तावाच्या आधारावर दहाव्या पंचवार्षिक योजनेतून मुलींच्या वसतिगृहांसाठी 1 कोटीचे अनुदान देण्यात आले होते. यामध्ये एकट्या नागपूर विद्यापीठातील 70 महाविद्यालयांचा समावेश होता. या अनुदानातून महाविद्यालयांना वसतिगृहाचे बांधकाम करण्यास सांगण्यात आले. यापैकी मोजक्‍या महाविद्यालयांनी स्वत:कडील पैसे लावून उच्च दर्जाचे वसतिगृह तयार केलेत.

मात्र, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली यासारख्या शहरातील बऱ्याच महाविद्यालयांनी केवळ वसतिगृहांचे बांधकाम करुन त्याचा उपयोग इतर शैक्षणिक कामासाठी केल्याचे दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयाद्वारे वसतिगृहामध्ये क्‍लासेस, विभागांतील प्राध्यापकांसाठी स्टाफ रूम आणि इतर प्रशासकीय कार्यालये हलविलीत. विशेष म्हणजे वर्धा येथील एका महाविद्यालयाने चक्क उपहारगृह आणि विद्यार्थ्यांसाठी कॉमन रूमची सुरुवात केल्याचे समजते. दुसरीकडे भंडारा येथील एका नामवंत महाविद्यालयाद्वारे वसतिगृहाच्या इमारतीमध्ये क्‍लासरुम तयार केले आहेत. इतर बहुतांश महाविद्यालयामधील वसतिगृहांचेही हेच चित्र असल्याचे दिसते. त्यामुळे अनुदान आयोगाच्या उद्देशालाच तिलांजली मिळत असल्याचे चित्र आहे.


मुलींचे बोगस प्रवेश
वसतिगृहाच्या नावावर अनुदान मिळाल्याने याबाबत अनुदान आयोगाकडे माहिती द्यावी लागते. मात्र, तालुका पातळीवर वसतिगृहात राहण्यासाठी मुली तयार होत नसल्याने वसतिगृहे रिकामी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बऱ्याच महाविद्यालयांकडून प्रवेशाची खोटी यादी तयार करण्याचे काम करण्यात येते. विशेष म्हणजे महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींचीच नावे या यादीत असल्याचे दिसून येते.


बऱ्याच महाविद्यालयांनी अनुदान घेऊन वसतिगृहे तयार केलीत, त्या वसतिगृहांमध्ये मुलीच येत नाहीत. महाविद्यालयाद्वारेही तसे प्रयत्न होताना दिसून येत नाही. काही महाविद्यालयांकडून जाहिराती देण्यात आल्यात. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळत नाही. याशिवाय काही संस्था जाणिवपूर्वक त्याचा वापर वसतिगृहासाठी होऊ नये यासाठी प्रयत्न करतात. याचे कारण वसतिगृह तयार झाल्यास वॉर्डन आणि इतर स्टाफचा खर्च देण्याची जबाबदारी महाविद्यालयावर येते.
एक प्राचार्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT