diabeties patients 
नागपूर

मधुमेहींसाठी हा काळ आहे अत्यंत महत्त्वाचा.... अशी घ्यावी काळजी

सकाळवृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूचा आजार संसर्गजन्य आहे. कोणालाही, कोणत्याही वयातील व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मधुमेही व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने अशा व्यक्तींना अधिक जोखीम असते. भारतात १० पैकी ७ लोकांना अनियंत्रित शुगर आहे, यांच्या फुफ्फुसात लवकर संसर्ग होतो. यामुळे कोरोनापासून बचावासाठी मधुमेहींनी अधिक काळजी घ्यावी. 

कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात ज्या रुग्णाचा पहिला मृत्यू झाला त्याला मधुमेह होता. चीन तर मधुमेहींची राजधानी आहे. भारतात साडेसात कोटी मधुमेही आहेत, त्यांची रोग प्रतिकारशक्ती ही सर्वसामान्यांच्या तुलनेने कमी आहे आणि त्यामुळे त्यांना जर अशा प्रकारच्या विषाणूची लागण झाल्यास त्यामुळे गुंतागुंत वाढून नागरिक तसेच ज्यांना मधुमेह, रक्तदाब, किडनी विकार असणाऱ्या व्यक्तींनी या काळात जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

टाईप वन मधुमेहींसाठी हेल्पलाइन
मधुमेहावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. मधुमेहींसाठी ही धोक्याची घंटा आहे. मधुमेहींनी नियमित औषधे घ्यावीत. औषध मिळत नसल्यास मेडिकल स्टोअर्समधून डॉक्टरांना फोन लावा, जेणेकरून औषध उपलब्ध नसल्यास ते औषध बदलून देता येईल. टाईप वन  मधुमेहींसाठी भारतीय मधुमेह संघटनेतर्फे लवकरच हेल्पलाइन सुरू करण्यात येत आहे, असे डॉ. गुप्ता म्हणाले. 

ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या 

- ताप येणे
- घशाला कोरड
- अंग दुखणे
- सर्दी होणे
- श्वास घेण्यास त्रास होणे

अशी घ्या काळजी 

- संतुलित आहार घेणे, 
- गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळावे.
- संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरावा. 
- वेळोवळी हात धुवावे.
- सॅनिटायझरचा वापर करावा.
- खोकताना, शिंकताना नाकावर तसेच तोंडावर रुमाल ठेवावा.
- आजारी व्यक्तींच्या संपर्कात राहणे टाळा.

शारीरिक स्वच्छता राखणे गरजेचे
चीनमध्ये मधुमेही रुग्णांमध्ये अन्य नागरिकांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना व्हायरसची प्राथमिक लक्षणं आढळून आली असल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. त्यामुळे सध्या मधुमेही रुग्णांनी प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी तोंडाला मास्क लावावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, शारीरिक स्वच्छता राखणे गरजेचे आहे. तसेच श्वास घ्यायचा त्रास जाणवत असेल किंवा सर्दी व खोकला अधिक काळ असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा.
- डॉ. सुनील गुप्ता, डायबेटिज केअर फाऊंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

IND vs WI 1st ODI Live: जॉन कॅम्बेल-जस्टीन ग्रीव्ह्स जोडीने इतिहास घडवला; १७ वर्षांनंतर विंडीजच्या ओपनर्सनी मोठा पराक्रम केला

Ashutosh Ranka Detained : गुवाहाटीत आशुतोष रांका ताब्यात; हिमंता बिस्वा सरमांवर अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप, दिला मोठा इशारा

Teacher Success Story: जिद्द, मेहनत अन् कुटुंबाची साथ..; बाबांचे स्वप्न लेकीने उचलले खांद्यावर; ज्योती शेलाराची शिक्षणप्रवासाची प्रेरणादायी कहाणी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT