What is the second test for Nagpurkars and why do they have to pass? 
नागपूर

नागपूरकरांसाठी दुसरी घटक चाचणी कोणती आणि का व्हावे लागेल उत्तीर्ण ?

राजेश प्रायकर

नागपूर : गेली दोन दिवस "जनता कर्फ्यू'निमित्त घरांमध्येच राहून कोरोना संक्रमण रोखण्याच्या प्रयत्नात उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे नागपूरकर आज दैनंदिन कामात रुजू झाले. त्यामुळे रस्त्यांवर गर्दी वाढली. महापौर संदीप जोशी व इतर लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनचा विरोध केला असला तरी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गर्दी केल्यास लॉकडाऊन लावणार, असे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसातील दुसऱ्या घटक चाचणीत उत्तीर्ण होण्याचे नागपूकरांपुढे आव्हान आहे. 

दोन दिवसांतील "जनता कर्फ्यू'ला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. आज मात्र नागपूरकर आपआपल्या कामानिमित्त बाहेर पडले अन्‌ शहरात दोन दिवसातील स्थितीच्या विपरित चित्र दिसून आले. त्यामुळे दोन दिवसांतील संयमामुळे आयुक्तांनी केलेली नागपूकरांची स्तुती लॉकडाऊनच्या शिक्षेत तर बदलणार नाही ना? अशी शंका निर्माण झाली आहे.

येत्या 31 जुलै रोजी चार दिवसांतील स्थितीचा आढावा घेणारी बैठक होणार आहे. यात लॉकडाऊन राहणार की नाही? ते ठरविले जाणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनच नव्हे तर कोरोनाच्या नियंत्रणासाठी कायमची जीवनशैली बदलण्याकडेही नागपूरकरांनी आता लक्ष देण्याच्या आवश्‍यकतेवर भर दिला जात आहे. मात्र पुढील तीन दिवस नागपूरकरांसाठी परीक्षेचेच आहेत. पुढील तीन दिवसांत नागरिक, दुकानदारांचा संयम ढासळल्यास लॉकडाऊनचे 15 दिवसांचे संकट येण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही लॉकडाऊन टाळण्यासाठी नागरिकांत जनजागृती करण्याकरिता कंबर कसली आहे. मात्र जनजागृती पुढील तीन दिवसच राहणार असल्याने नागपूरकरांनी यापुढे स्वयंस्फूर्तीने कोव्हीडसंदर्भातील नियमाचे पालन करणे आवश्‍यक आहे. लॉकडाऊनला लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. परंतु आयुक्त मुंढे यांना शहरातील स्थितीबाबत राज्य सरकारने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

कोरोना नियंत्रणासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक कठोर पाऊले उचलली. त्यामुळे नागरिकांनी सवलतीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केल्यास लॉकडाऊनचा कठोर निर्णय ते घेऊ शकतात, असे पालिकेतील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागपूरकरांनी केवळ लॉकडाऊन टाळण्यासाठीच नव्हे तर कोरोना टाळण्यासाठीही गंभीर होण्याची गरज अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

सहाही विधानसभा क्षेत्रात आजपासून जनजागृती 
शुक्रवारी झालेल्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरल्यानंतर उद्या 28 ते 30 जुलैपर्यंत दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सहाही विधानसभा मतदार संघात आमदार, नगरसेवक कोविडसंदर्भातील नियमाबाबत जनजागृती करणार आहे. दक्षिण-पश्‍चिम मतदार संघात खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, पूर्व नागपुरात आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर मनीषा कोठे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, दक्षिण नागपुरात आमदार मोहन मते, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, मध्य नागपुरात आमदार विकास कुंभारे, आमदार गिरीश व्यास, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, उत्तर नागपुरात आमदार प्रवीण दटके, वीरेंद्र कुकरेजा, बसपा नेत्या वैशाली नारनवरे, पश्‍चिम नागपुरात महापौर संदीप जोशी, आमदार विकास ठाकरे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव जनजागृती करणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : मराठवाड्यात किती नगराध्यक्ष, किती नगरसेवक निवडून येणार? एका क्लिकवर वाचा

Lionel Messi India Visit : लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याने फुटबॉलप्रेमींना दिली प्रेरणादायी ऊर्जा

Suryakumar Yadav Cricket Stats : हे ‘सूर्यग्रहण’ सुटायला हवे!

साप्ताहिक राशिभविष्य : २१ डिसेंबर २०२५ ते २७ डिसेंबर २०२५

Morning Breakfast Recipe: Fit राहायचंय? मग सकाळी नाश्त्यात बनवा ज्वारीच्या पीठापासून मस्त नाश्ता, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT