What will happen to Tukaram Mundhe 
नागपूर

स्मार्ट सिटी कंपनीची बैठक सुरू; तुकाराम मुंढे यांचे काय होणार?

राजेश चरपे

नागपूर : स्मार्ट सिटी कंपनीची बैठक सुरू झाली असून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंढे यांची संचालक म्हणून नियुक्ती आणि त्यानंतर मुख्याधिकारी म्हणून कोणाला नेमायचे हे या बैठकीत ठरणार आहे. विशेष म्हणजे सुमारे पाच महिन्यानंतर कंपनीची बैठक होत असून कंपनीचे अध्यक्ष प्रवीण परदेसी यात उपस्थित राहणार आहे. त्यामुळे मुंढे यांना पत्रद्वारे की फोनवरून सीईओपदाचे सूत्रे दिली याचे रहस्य आज उघडणार आहे.

महापौर संदीप जोशी यांच्यासह जवळपास सर्वच संचालकांचा मुंढे यांना सीईओ म्हणून नियुक्तीस विरोध आहे. विशेष म्हणजे अधिकृत नियुक्तीपूर्वीच मुंढे यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे सूत्रे आपल्या हाती घेतली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी कंपनीतील नऊ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले तसेच सुमारे 20 कोटी रुपयांचा निधीसुद्धा खर्च केला. महापालिकेतील सत्तधारी भाजपने नियुक्तीपूर्वीच मुंढे यांनी घेतलेल्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. संचालकच नसताना कुठल्या अधिकारात मुंढे यांनी निर्णय घेतले असा आरोप त्यांवर केला जात आहे.

आपल्या कंत्राटदारांना लाभ पोचवण्यासाठी मुंढे यांनी नियमबाह्य कामे केली तसेच आर्थिक अनियमितता केल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणने आहे. या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारसुद्धा महापौरांना नोंदवली असून उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे.

विशेष म्हणजे या बैठकीला कंपनीचे अध्यक्ष प्रवीण परदेसी उपस्थित राहणार आहे. स्मार्ट सिटीचे माजी सीईओ रामनाथ सोनवणे यांची बदली झाली आहे. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर परदेसी यांनी आपणास सीईओपदाची जबाबदारी सोपविली होती असा दावा मुंढे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी फोनवरून परदेसी यांनी अधिकार सोपवल्याचे मुंढे यांनी जाहीर केले होते. आज स्वतःच परदेसी बैठकीला उपस्थित राहणार असल्याने मुंढे यांना सूत्र कशी आणि केव्हा दिले याचे गुपित समोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT