Flight 
नागपूर

रद्द झालेल्या विमान तिकीटांचा प्रवाशांना परतावा कधी? : सर्वोच्च न्यायालय

सकाळवृत्तसेवा

नागपूर : लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वाढ झाल्यानंतर रद्द करण्यात आलेल्या विमान तिकीटांचा परतावा प्रवाशांना कधी देणार, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने नागरी उड्डयन मंत्रालय आणि नागरी उड्डयन संचालनालया (डीजीसीए)ला केला. याबाबत दोनही विभागांना नोटिस बजावली असून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. एअर पॅसेंजर असोसिएशन ऑफ इंडियाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

याचिकेनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसावा म्हणून विमान प्रवासावर निर्बंध लादण्यात आले. त्यानंतर, नागरी उड्डयन मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी अधिसुचना जारी करीत 25 मार्च ते 14 एप्रिल या पहिल्या लॉकडाऊनच्या कालावधीत प्रवाशांकडून आकारण्यात आलेले प्रवास शुल्क परत करण्याचे आदेश विमान कंपन्याना दिले होते. तसेच, प्रवाशांनीसुद्धा ही रक्कम परत मिळावी म्हणून मागणी केली होती.

याशिवाय, 15 एप्रिल ते 3 मे दरम्यानच्या दुसऱ्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये रद्द करण्यात आलेल्या तिकीटांवर रद्द करण्याचे शुल्क प्रवाशांकडून आकारु नये, असेही या अधिसुचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. तर, डीजीसीएने 19 एप्रिल रोजी अधिसुचना जारी करीत प्रवाशांना 4 मे पासून विमान तिकीटे देऊ नये आणि प्रवाशांचे तिकीट शुल्क परत करावे, असेही आदेश विमान कंपन्याना दिले होते. मात्र, विमान कंपन्या प्रवाशांचे तिकीटांचे शुल्क परत करण्यात अपयशी ठरल्या आहेत, असा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

विमान कंपन्या शुल्काच्या बदल्यामध्ये प्रवाशांना इच्छा नसताना "क्रेडीट शेल' ची ऑफर देत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नागरी उड्डयन मंत्रालय आणि डीजीसीएला नोटीस बजावली असून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. रोहीत राठी यांनी, केंद्र शासनातर्फे ऍड. तुषार मेहता यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस. के. कौल आणि एम. आर. शाह यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

"क्रेडीट शेल'ची सक्ती
विमान कंपन्या प्रवाशांवर बेकायदोशिररित्या "क्रेडीट शेल'ची सक्ती करीत आहेत. क्रेडीट शेलच्या माध्यमातून प्रवासी यांच कंपनीच्या पुढील विमान प्रवाशाचे शुल्क भरु शकतो. बहुतेक कंपन्यांककडून ऑफर केल्या जाणाऱ्या क्रेडीट शेलचा कालावधी सहसा एक वर्षांचा असतो, अशी माहिती ऍड. रोहित राठी यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT