wine-shop 
नागपूर

नागपुरातील "त्या' वाईन शॉपवर कारवाई केव्हा?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील एका नामांकित वाइन शॉपमधून दुसऱ्या बारमध्ये बिअरच्या चारशे पेट्या नियमबाह्य पद्धतीने हलविल्या जात असताना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड घालून कारवाई केली होती. दोन दिवसांत चौकशी पूर्ण करून कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठांकडून सांगण्यात आले असताना चार दिवस उलटल्यानंतरही अद्याप कुठलीच करवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
 लॉकडाउनच्या दिवशीपर्यंत असलेल्या साठ्याचीच विक्री करण्याची परवानगी बिअरबारला देण्यात आली आहे. बऱ्याच बारमालकांनी छुप्या पद्धतीने बंदच्या काळात अवैध पद्धतीने मद्याची विक्री केल्याची चर्चा आहे. यादरम्यान अनेक बार व दारूची दुकाने फोडण्याचे प्रकार घडले. ही फोडाफोडी दुकानदारांच्याच संगनमताने झाल्याचेही बोलले जाते. लॉकडाउन झाल्याच्या दिवशी असलेला साठा भरून काढण्यासाठी वाइन शॉपमधून तो भरला जात असावा, असा कयास आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य नागपुरात एक वाइन शॉप आहे. या शॉपच्या फीडर गोदामातून बिअरच्या पेट्या दुसऱ्या एका बिअर बारमध्ये वळत्या करण्यात आल्या. 300 ते 400 पेट्या स्थलांतरित झाल्याची माहिती आहे. वाईन शॉपमधून बिअर बारमध्ये अशा प्रकारे बिअरच्या पेट्यांची इतरत्र वाहतूक करताना परवानगी आवश्‍यक असते. परंतु, हा माल हलविताना कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याची परवानगी घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते. तक्रारीनंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. हे प्रकरण दडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून फोन आल्याची चर्चा रंगली. दरम्यान, विभागीय उपायुक्त मोहन वर्दे यांनी "सकाळ' बोलताना दोन दिवसात चौकशी पूर्ण होऊन दोष आढळल्यास कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. चार दिवस होत असताना अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने प्रकरण दडविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. उपायुक्त मोहन वर्दे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate will be arrest : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

मेल-एक्सप्रेस आणि लोकलच्या संख्येत वाढ, प्लॅटफॉर्मचा विस्तार, नवीन 238 ऑटोमॅटिक डोअर गाड्या... प्रवाशांसाठी मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : कायद्यापुढे कोणीही मोठं नाही; आमच्या सरकारने हे प्रत्यक्ष दाखवून दिलं – रावसाहेब दानवे

SCROLL FOR NEXT