Where did the crime branch squads go? The city is full of thieves 
नागपूर

गुन्हे शाखेची पथके गेली कुठे? शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; दोघींची पर्स हिसकावली

अनिल कांबळे

नागपूर : शहरात भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पोलिसांसोबत लपंडाव सुरू आहे. चोरट्यांनी महिला आणि वृद्धांना टार्गेट केले असून त्यांची लूटमार करीत आहेत. शहरात दोघींच्या पर्स हिसकावल्यामुळे गुन्हे शाखेची विशेष पथके गेले कुठे, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असलेल्या परिचारिकेच्या हातातील ८३ हजार रोख व इतर महत्त्वाची कागदपत्र असलेली पिशवी हिसकावून दुचाकीस्वार चोरांनी पळ काढला. धंतोली सारख्या गर्दीच्या परिसरात दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी तकीया निवासी कविता गौतम देशपांडे (३९) यांच्या तक्रारीवरून २ आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे.

कविता धंतोलीच्या एका रुग्णालयात परिचारिका आहेत. त्यांना बँकेत पैसे जमा करायचे होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पिशवी घेऊन पायी मुंजे चौकातील महाराष्ट्र बँकेकडे निघाल्या. त्यांच्या पिशवीमध्ये पर्स होती. त्या पर्समध्ये रोख ८३ हजार, पासबुक, एटीएम कार्ड, लोंदे ज्वेलर्सचे कार्ड, बजाज फायनान्सचे कार्ड व मोबाईल असा एकूण ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल ठेवला होता.

साठे मार्गावर अक्षयदीप बंगल्यासमोर अचानक २५ वर्ष वयोगटातील २ तरुण दुचाकी वाहनाने मागून आले. त्यांनी कविता यांच्या हातातील बॅग हिसकावली. भरधाव तेथून फरार झाले होते. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. धंतोली पोलिस घटनास्थळावर पोहोचले. कविताच्या तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस चोरांचा शोध घेत आहेत.

दागिन्यांची पर्स लंपास

कामठी मार्गावरील सारा सेलिब्रेशनमध्ये शबाना काजी मोबीनउद्दीन (४९, रा. आदर्श कॉलनी, गिट्टीखदान) यांच्या मुलाच्या लग्नाचा पाहुणचार होता. कार्यक्रमादरम्यान नातेवाइकांनी वधू-वरासोबत फोटो काढण्यासाठी मंचावर गर्दी केली होती. यावेळी फोटो काढण्यासाठी शबाना यांनी पर्स मंचावरच ठेवली होती. त्यांच्या पर्समध्ये १ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते.

या दरम्यान अज्ञात आरोपीने सर्वांची नजर चुकवून त्यांची पर्स लंपास केली. लग्नाच्या व्यस्ततेत त्यांचे पर्सकडे दुर्लक्ष झाले. कार्यक्रम आटोपल्यावर त्यांनी पर्स पाहिली असता गायब होती. त्यांनी घटनेची तक्रार पोलिसात दाखल केली. प्राथमिक तपासानंतर यशोधरानगर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT