Which university will not raise fees ? 
नागपूर

कोणते विद्यापीठ करणार नाही शुल्कवाढ....वाचा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वर्षभरासाठी कुठल्याही प्रकारची शुल्कवाढ करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूर युनिर्व्हसिटी टिचर्स असोसिएशनने याबाबत कुलगुरूंकडे मुद्दा लावून धरला होता. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

राज्यात कोरानाचा प्रादुर्भाव वाढल्याने उद्योगधंद्यासह विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद करण्यात आलीत. यामुळे अनेकांचे रोजगार गेलेत. शेतीवर मोठा परिणाम झाला. रोजगाराची संसाधनेही हिरावल्या गेलीत. शिवाय कुटूंबीयांवर आर्थिक संकट ओढविले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठीही पालकांकडे पैसे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्क भरता येणे शक्‍य नाही.

विद्यापीठाकडून दरवर्षी शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव असतो. कोरोनामुळे जिल्हावार बंदी लागू आहे. अशा परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. शिवाय शुल्कवाढ झाल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच थांबण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. नागपूर युनिर्व्हसिटी टिचर्स असोसिएशनने याबाबत कुलगुरूंकडे निवेदन सादर करीत यावर्षी शैक्षणिक सत्रात कुठल्याच प्रकारची शुल्कवाढ होऊ नये अशी मागणी केली होती. तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन कोंगरे यांनी सातत्याने हा विषय कुलगुरूंकडे लावून धरला होता. त्यातूनच गुरूवारी (ता.2) पार पडलेल्या बैठकीत विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात कुठल्याच प्रकारची शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्यामुळे विद्यापीठातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे.


कोरोना काळात विद्यार्थी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळेच नुटातर्फे त्यांच्याकडून कुठलेही शैक्षणिक शुल्क घेण्यात येऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली होती. त्याच भूमिकेतून मागणीचा पाठपुरावा करीत विद्यापीठाकडून ती मागणी मान्य करुन घेण्यात संघटनेला यश आले.
डॉ. नितीन कोंगरे,
व्यवस्थापन परिषद सदस्य.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: बाळापूर नगरपरिषद निवडणूक निकाल, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी यश

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT