file
file 
नागपूर

मित्रहो, आनंदाचे क्षण टिपताना, दुःख केवळ कॅमेराबद्ध झाले !

संदीप भुयार

कळमेश्वर (जि.नागपूर): कोरोना, लॉकडाउनमुळे लग्न हंगाम वाया गेला. व्यवसाय ठप्प झाल्याने फोटोग्राफर, व्हिडिओ शूटिंग व्यावसायिक व व्यवसायावर अवलंबून असणारे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यात लॉकडाउन संपल्यानंतर येणाऱ्या मंदीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, अशी चिंता फोटोग्राफर्सना लागली आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा?
तालुक्‍यात फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, व्हिडिओमिक्‍सिंग, अल्बम डिझयनर, क्रेन, ड्रोन ऑपरेटर मिळून सुमारे44 जण आहेत. मागील दिवाळीपासून सुरू झालेला लग्न हंगाम जूनपर्यंत सुरू राहणार होता. या काळात लग्नतिथी जास्त होत्या. यामुळे अनकांनी नवीन कॅमेरा, व्हिडिओ, कॅमेरे खरेदी केले होते. त्यासाठी खासगी फायनान्स करणाऱ्या कंपन्यांकडून कर्जही काढले आहे. मात्र, कोरोनाचा फटका इतर व्यवसायाप्रमाणे फोटोग्राफरलाही बसला आहे. आज या व्यवसायात 60टक्के लोक 30 ते 50 वयोगटातील आहेत. ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांचे कर्जाचे हप्ते सोडा; पण दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

फोटोग्राफर्सची वाढली चिंता
काही ऑपरेटर नामांकित फोटोग्राफरकडे काम करतात. त्यांना सध्या सांभाळून घेतले आहे. पण, तेही किती महिने? त्यांचा खर्च उचलतील या फोटोग्राफरला पुढील महिन्यांची चिंता सतावू लागली आहे. कारण, लॉकडाउन उठल्यावर लगेच कोणी फोटो काढण्यासाठी स्टुडिओमध्ये येणार नाही. यामुळे दुकान भाडे, लाईट बिलचा खर्च निघेल की नाही, मुलांचे नवीन शैक्षणिक वर्ष, कर्जाचा हप्ता दिला जाईल की नाही, या चिंतेने फोटोग्राफरला ग्रासले आहे. भविष्यात काय होईल, या विचाराने रात्री झोप येत नसल्याचे प्रतीक कोल्हे, किशोर पंचभाई, महेंद्र धकाते, राजेश वरनकर, प्रदीप गणोरकर, अजय खेडकर, आशीष ढोले यांनी सांगितले

पुढील तीन महिने तरी सांभाळून घ्या !
दरवर्षी उन्हाळ्याच्या सिझनमध्ये तीन ते चार लाख कमवायचो, मात्र यंदा विवाह सोहळे नसल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शासनाने ही गंभीर बाब लक्षात घेऊन कमीत कमी पुढील तीन महिने तरी आठ हजारांची मदत करावी.
- अरविंद लिंगायत
अध्यक्ष फोटोग्राफर असोसिएशन
कळमेश्वर तालुका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT