malati
malati 
नागपूर

मानवतेची सेवा करणा-या वटवृक्षाला जागतिक आरोग्य संघटनेचा सलाम 2020 परिचारिका वर्ष घोषित

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना आणीबाणीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून
 कोरोनाग्रस्तांची सुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांचे मोल प्रथमच जागतिक आरोग्य संघटनेने जाणून घेतले. 2020 हे वर्ष परिचारिका वर्ष म्हणून घोषित केले आहे. परिचर्या व्यवसायाचे स्वतंत्र संचालनालय उभारावे. जोपर्यंत नर्सिंग संचालनालय होत नाही, तोपर्यंत मानवता सेवेचा हा वटवृक्ष उपेक्षित राहणार आहे. अशाही परिस्थितीत कोरोनाविरुद्धचे युद्ध आम्ही जिंकणार, असा विश्‍वास परिचारिकांशी केलेल्या संवादातून पुढे आला.
मेडिकलमध्ये वॉर्ड क्रमांक 25, पेइंग वॉर्ड, ट्रॉमा अर्थात कोविड हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांचे नातेवाईक आपल्या रुग्णाजवळ जात नाहीत. वॉर्डात सेवा देणारी परिचारिका मात्र कोरोनाबाधिताला इंजेक्‍शन देते. औषधांचा डोस देण्यासाठी ती दर दिवसाला रुग्णाच्या सानिध्यात येते. हे लाइव्ह दृश्‍य सोमवारी फ्लॉरेन्स नाईटिंगेल (12 मे) यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवता आले. कोविड हॉस्पिटलचा वॉर्ड हाउसफुल्ल होता. सारे कोरोनाबाधित येथे खाटेवर होते. या रुग्णांना औषध देण्यासाठी एक-दोन परिचारिका धावाधाव करीत होत्या. त्यांच्या रुग्णसेवेची आचारसंहिता जाणून घेण्यासाठी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, हाक येताच ती परिचारिका रुग्णाच्या दिशेने धाव घेत होती. वॉर्डात डॉक्‍टर नव्हते. सफाई कामगार नव्हते. अटेंडंट नव्हते. केवळ दोन परिचारिका तेवढ्या दिसत होत्या. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ परिचारिकांशी संवाद साधला असता त्यांनी "सकाळ'जवळ मन मोकळे केले.

सविस्तर वाचा - शू...आमच्या गावात तुम्हाला प्रवेश नाही बरं का!
कुशल शैक्षणिक संस्थांचा अभाव
कोरोनाविरुद्ध डॉक्‍टरांच्या खांद्याला खांदा लावून परिचारिका युद्धातील सैन्याप्रमाणे लढत आहेत. त्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मात्र, सध्या परिचारिकांचा तुटवडा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या "स्टेट ऑफ द वर्ल्डस नर्सिंग'च्या अहवालानुसार, जगभरात परिचारिकांच्या तुटवड्याचा फटका सर्वच देशांना बसत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. कुशल परिचारिका घडविणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा अभाव आहे. दर्जेदार नर्सिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच नर्सेसच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र नर्सिंग संचालनालयाची गरज आहे. स्वतंत्र नर्सिंग संचालनालय झाल्यास परिचारिकांच्या वेतनासंदर्भातील नियोजन होईल. वेतन कमी असल्याने गुणवान परिचारिका विदेशात किंवा दुसऱ्या राज्यात नोकरीसाठी जातात. राज्यात नर्सिंग क्षेत्रात दर्जात्मक शिक्षण व परिचारिकांच्या सेवांचे प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. ज्यात उत्तम शिक्षण, सेवा व वेतन मिळणे अपेक्षित आहे, असे इंटकचे नेते त्रिशरण सहारे म्हणाले.
परिचारिका व्यवसायाकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून बघत नाही. कोरोनाविरुद्धच्या या युद्धात परिचारिका आघाडीवर आहेत. हे त्यांचे लढाऊपण लक्षात घेत जागतिक आरोग्य संघटनेने 2020 हे परिचारिका वर्ष म्हणून घोषित केले आहे. सैनिक लढत असताना त्यांच्यासोबत दारूगोळा असतो. त्याचप्रमाणे कोरोनाशी सुरू असलेल्या युद्धात परिचारिकांनाही पीपीई किट, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर या सुरक्षा साधनांसह मानसिक आधाराची गरज आहे.
मालती डोंगरे, परिचर्या अधीक्षक, मेडिकल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT