Who defeated BJP in Nagpur graduate constituency 
नागपूर

पराभवाचे खापर कुणावर? भाजपमध्ये अस्वस्थता; स्टार नेते पडले फिके

राजेश चरपे

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात महापौर संदीप जोशी यांचा झालेला धक्कादायक पराभव भाजपला चांगलाच जिव्हारी लागला आहे. विदर्भात एवढे स्टार नेते असताना पराभव झालाच कसा याचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे पराभवाचे खापर आपल्यावर फुटू नये यासाठी अनेक नेते सावधगिरी बाळगत आहेत.

जोशी यांच्या पराभवाने माजी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याची चांगली संधी महाआघाडीच्या नेत्यांना मिळाली आहे. तशा प्रतिक्रियासुद्धा उमटल्या आहेत. सत्ता उलटवण्यापेक्षा भाजपने आधी आपले घर सांभाळावे असेही विरोधकांकडून त्यांना डिवचले जात आहे. त्यामुळे भाजपचे नेते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. विशेष म्हणजे पदवीधर मतदारसंघात आजवर भाजपचा उमेदवार कधीच पराभूत झाली नव्हता.

संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील होते. त्यामुळे कुठे दगाफटका होणार नाही असे सर्वांना वाटत होते. स्वतः फडणवीस शेवटचे दोन दिवस शहरात ठाण मांडून बसले होते. पदवीधरांचा विभागीय मेळावा त्यांनी घेतला.

ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विदर्भातील सर्व प्रमुख नेते मेळाव्याला उपस्थित होते. आमच्यात कुठलेच मतभेद नाही असा संदेशही यातून देण्यात आला. मात्र, त्यानंतरही पराभव झाल्यामुळे आता एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. शंककुशंका व्यक्त केल्या जात आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपकडे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर असे दोन प्रमुख नेते आहेत. त्यांचे जिल्ह्यावर वर्चस्व आहे. ते प्रचारातही दिसले. भंडारा-गोंदियामध्ये आमदार परिणय फुके याच्याशिवाय खासदार सुनील मेंढे आहे. वर्धा जिल्ह्यातील खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर आहेत.

नागपूर जिल्ह्यात ऊर्जावान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. ते निवडणूक प्रमुख होते. मंत्री असताना बावनकुळे नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यात झपाटल्यासारखे काम करीत होते. नागपूरमध्ये शहराध्यक्ष प्रवीण दटके, मोहन मते, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, ग्रामीणमध्ये सुमारे पाच हजार मतांचा गठ्ठा मते असलेले समीर मेघे एवढे स्टार आमदार पक्षाच्या दिमतीला होते.

फ्लोटिंग मते घेण्यात आम्ही कमी पडलो

जोशी यांना एकूण ४१ हजार ५४० मते मिळाली. त्यामुळे जातीय समीकरण जुळून आले, ओबीसी नाराज आहेत असे दिसत नाही. भाजपसोबत असलेल्या मागासवर्गीयांची मते जोशी यांना मिळाली आहेत. भाजपच्या नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद असते तर जोशी यांना चाळीस हजार मते मिळालीच नसती. मात्र, फ्लोटिंग मते घेण्यात आम्ही कमी पडलो. त्यामुळे पराभव झाल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.

 संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT