Who is fielding for the election of Vice Chancellor  
नागपूर

कुलगुरू निवडीसाठी कोण लावत आहेत फिल्डींग....वाचा सविस्तर

मंगेश गोमासे

नागपूर :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी 30 इच्छुक उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. आता इच्छुक उमेदवारांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. यासाठी उमेदवारांनी नेते आणि गॉडफादरच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ 7 एप्रिल रोजी संपला. त्यानंतर प्रभारी कुलगुरू पदाची सूत्रे डॉ. मुरलीधर चांदेकर यांचाकडे देण्यात आलीत. त्यापूर्वीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नवा कुलगुरू मिळावा यासाठी 19 मार्चला जाहिरात देण्यात आली. 

या जाहिरातीनुसार 20 एप्रिलपर्यंत पात्र व्यक्तींना अर्ज सादर करावयाचे होते. 20 एप्रिल शेवटच्या तारीखेनंतर ई-मेलच्या माध्यमातून जवळपास 132 हून अधिक उमेदवारांनी अर्ज आणि बायोडाटा पाठविला. त्यात विद्यापीठातील कुलगुरू, माजी कुलगुरूंसह दिग्गजांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केल्याचेही माहिती समोर आली होती.

आता मुलाखतीसाठी जवळपास 30 उमेदवारांना पात्र करण्यात आले आहे. यात विद्यापीठातून डॉ. के. सी. देशमुख, डॉ. राजू मानकर, डॉ. प्रदीप कुंडल, डॉ. विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, भारतीय शिक्षण मंडळाच्या डॉ. उज्ज्वला चक्रदेव, इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागाचे डॉ. शर्मा, डॉ. ज्योत्स्ना मेश्राम, डॉ. अनंत देशमुख यांचा समावेश आहे. गुरुवारी (ता. 30) आणि शुक्रवारी (ता. 31) यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या प्रक्रियेतून राज्यपालांच्या मुलाखतीसाठी अंतिम पाच उमेदवारांची नावे निवडण्यात येणार आहेत. त्यापैकी एकाची निवड विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर होईल. यासाठी अनेक उमेदवारांनी राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांच्या पायऱ्या झिजविण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, राज्यात भाजपचे राज्यपाल आणि त्या विरोधातील सरकार असल्याने अनेक उमेदवारांची अडचण येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लक्ष्मण बांदल; शशिकांत शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Latest Marathi News Update : पुण्यात बी. जे. मेडिकल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु

Bangladesh Onion Export : कांद्याच्या बाजारात नवा खेळाडू, श्रीलंकेसाठी बांगलादेशाची निर्यात तयारी; भारतीय कांद्यासमोर नवे आव्हान

SCROLL FOR NEXT