nagpur-university 
नागपूर

रातुम नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची वर्णी?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नवा कुलगुरू मिळावा यासाठी 19 मार्चला जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीनुसार 20 एप्रिलपर्यंत पात्र व्यक्तींना अर्ज सादर करावयाचे होते. त्यामुळे विद्यापीठातील बऱ्याच दिग्गजांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे नोडल ऑफीसर प्रो. प्रेमकुमार यांनी दिलेल्या सवलतीनुसार ई-मेलच्या माध्यमातून अनेकांनी बायोडाटा पाठविल्याचे कळते.
कुलगुरू पदाच्या निवड प्रक्रियेसाठी समिती तयार करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी सेवानिवृत्त जस्टीस दिलीप भोसले, सदस्य सचिव म्हणून पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे यांची तर विद्यापीठाच्या संयुक्त समितीद्वारे कुलगुरू निवडीसाठी तयार करण्यात येणाऱ्या समितीवर कानपूर आयआयटीचे संचालक प्रो. अभय करंदीकर यांची निवड करण्यात आली आहे. 19 मार्चला कुलगुरू पदासाठी अर्ज मागविण्याच्या उद्देशाने या समितीने नोडल अधिकारी म्हणून आयआयटी पवईचे कुलसचिव प्रो. प्रेमकुमार यांच्यामार्फत जाहिरात प्रकाशित केली. त्या जाहिरातीनुसार 20 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार होते. मात्र, कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने उमेदवार प्राध्यापकांना ना हरकत प्रमाणपत्र मिळणार नसल्याने अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. मात्र, ती मुदतवाढ न देता, बायोडाटा ई-मेलच्या माध्यमातून पाठवित उर्वरित कागदपत्रे लॉकडाऊननंतर पाठविण्याची मुभा प्रो. प्रेमकुमार यांनी दिली. यानुसार आज शेवटला दिवस असल्याने विद्यापीठातील दिग्गजांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केल्याचे समजते. यामध्ये प्रामुख्याने डॉ. विनायक देशपांडे, डॉ.के.सी. देशमुख, डॉ. राजू मानकर, डॉ. जी.एस. खडेकर, डॉ. कुंडल, डॉ. ज्योत्स्ना मेश्राम, डॉ. अनंत देशमुख यांच्यासारख्या नावांचा समावेश आहे. अर्ज सादर केल्यावर समितीची बैठक घेण्यात येईल. यानंतर अर्जाची छाननी करण्यात येऊन पात्र 20 किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांना बोलाविण्यात येईल. गेल्यावेळी जवळपास 132 हुन अधिक अर्ज आले होते हे विशेष.

अशी आहे पात्रता

  • 15 वर्षाचा प्राध्यापक म्हणून अनुभव
  • 5 वर्ष प्रोफेसर आणि विभागप्रमुखाचा अनुभव
  • आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचा अनुभव
  • नामवंत आंतरराष्ट्रीय पाच जर्नलमध्ये पेपरचे प्रकाशन आणि पुस्तके
  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग
  • नेतृत्वगुण आणि व्हीजन डॉक्‍युमेंट असणे
  • विद्यापीठाच्या विविध प्राधीकरणात कामाचा अनुभव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT