who will win in graduate constituency election in nagpur  
नागपूर

पदवीधर निवडणूक; जोशी की वंजारी? कोण मारणार बाजी? आज होणार फैसला

राजेश चरपे

नागपूर ः नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीचा निकाल उद्या गुरुवारी जाहीर होणार असून भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी आणि काँग्रेसचे ॲड. अभिजित वंजारी यांचा फैसला होणार आहे. नागपूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असली तरी सर्वाधिक सुमारे एक लाख मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे निकाल नागपूरकर मतदारांवरच अवलंबून राहणार आहे. 

यंदा प्रथमच पदवीधर निवडणुकीत विक्रमी मतदान झाले आहे. तसेच चुरसही बघायला मिळाली. प्रत्येक उमेदवाराने आपल्या समर्थकांना मतदारांना बाहेर काढल्याने टक्केवारी प्रचंड वाढली आहे. मतदानाचा टक्का वाढल्याने काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक ७२ टक्के मतदान झाले आहे. 

भंडारा जिल्ह्यातून काँग्रेसला मोठी आशा वाटत आहे तर गडचिरोलीमध्ये भाजप आघाडीवर राहील असे जोशी यांचे समर्थक दावा करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप आणि काँग्रेसला बरोबर मतदान होईल असा कयास व्यक्त केला जात आहे. मात्र जोशी आणि वंजारी यांच्यासह एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी रिपाइं मतांवर दावा करणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यांनी आपली कामगिरी जोख बजावली तर भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

यंदा प्रथमच काँग्रेसचे नेते प्रचारात होते. मेळावे घेतले. अनेक बूथवर पदाधिकारी बसलेले दिसले.  महाआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही नेते व कार्यकर्ते या निमित्ताने एकत्र दिसले. महाआघाडीसाठी हे शुभसंकेत असले तरी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत किती नेते पोहचले हा प्रश्न अनुत्तरित आहे. दुसरीकडे संदीप जोशी यांच्यासाठी भाजपने आपली यंत्रणा ताकदीने राबवली. 

माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस शेवटचे दोन दिवस शहरात ठाण मांडून बसले होते. अनेक नेत्यांच्या भेटीगाठी तसेच गुप्त बैठकाही त्यांनी घेतल्या. काँग्रेसच्या काही नेत्यांच्याही घरी त्यांनी आकस्मिक भेटी दिल्याचे कळते. त्यामुळे काँग्रेसला धडकी भरली आहे. विदर्भाच्या अनुशेषाचे अभ्यासक नितीन रोंघे हेसुद्धा आशावादी आहेत. मात्र त्यांच्याकडे असलेली यंत्रणा आणि रसद फार तोकडी होती. केवळ अनुशेष आणि विदर्भावरील अन्यायाला किती पदवीधर मतदान करतात हे उद्याच कळणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : राजकोटच्या काही भागांत मुसळधार पाऊस

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT